लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले नसतील तर हे काम करा ladki bahin yojana installment status

लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले नसतील तर हे काम करा ladki bahin yojana installment status

ladki bahin yojana installment status : महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी राज्यातील अनेक महिलांनी ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज केलेले आहेत. योजनेमधील पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये लाभ दिला जाणार आहे. ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्या अर्जाची तपासणी करण्याचे काम सुरु आहे. तसेच ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, अशा महिलांना योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झालेली आहे.

या महिलांच्या खात्यावर जमा झाले योजनेचे पैसे

ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केले आहेत, तसेच अर्ज केल्यानंतर अर्ज मंजूर झालेले असतील तर अशा महिलांच्या खात्यावर शासनाने पैसे पाठविले होते. पात्र लाभार्थी महिलेच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक आहे अशा महिलांचे पैसे जमा झालेले आहेत.

अर्ज भरल्यानंतर आपला अर्ज Approved होणे आवश्यक आहे. अर्ज Approved झाल्यानंतरच महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे. अर्जामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास आपला अर्ज Disapproved होईल, त्यानंतर लाभार्थीला अर्जामध्ये पुन्हा बदल करता येणार आहे. अर्ज कोणत्या कारणामुळे Disapproved झाला आहे लाभार्थीने हे चेक ladki bahin yojana installment status करून अर्ज पुन्हा सबमिट करावा. ज्या महिलांचे अर्ज Reject झालेले आहेत अशा महिलांसाठी आता पुन्हा अर्ज करण्यासाठी पर्याय उपलब्ध नाही परंतु काही कालावधी नंतर जर पुन्हा अर्ज करण्यासाठी पर्याय उपलब्ध झाला तर आपल्या साईट वरती या संदर्भात अपडेट दिली जाईल.

पैसे मिळाले नसतील तर खालील काम करा.

ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक नाही अशा महिलांचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे जुलै व ऑगस्ट महिन्याचे तसेच इतर महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत. यामुळे ज्या महिलांना योजनेचे पैसे मिळाले नाहीत अशा महिलांनी आपले आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक आहे का हे चेक करणे आवश्यक आहे.

आधार कार्ड कोणत्या बँकमध्ये लिंक आहे हे चेक करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यासाठी आपले आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणे आवश्यक आहे? टीप : आधार कार्ड कोणत्या बँकेत लिंक आहे हे चेक करण्यासाठी आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.

  • सर्वप्रथम मोबाईल मध्ये https://myaadhaar.uidai.gov.in/ ही वेबसाईट ओपन करा.
  • वेबसाईट ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी Login पर्याय दिलेला आहे त्यावरती क्लिक करून आधार कार्ड नंबर टाका व खालील Captcha कोड भरून Log with OTP बटन वरती क्लिक करा.
  • आधार कार्ड ला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून लॉगिन करा.
  • लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला Bank Seeding हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपले आधार कार्ड कोणत्या बँकेत लिंक आहे. त्या ठिकाणी पाहायला मिळेल.
  • आधार कार्ड जर कोणत्याच बँकेत लिंक नसेल तर त्या ठिकाणी कोणतीही बँक दाखवणार नाही.
  • Bank Seeding वरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी Active स्टेटस असणे गरजेचे आहे.
  • जर Bank Seeding हे InActive असेल तर आपण आपल्या बँकेत जाऊन आधार कार्ड व Bank Seeding करण्यासाठी चा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरून बँकेत जमा करावा.

Similar Posts

12 Comments

  1. Approval jhale Majhi bhai ladki Yojana mala paise nahin bhej le sagranche bhetle majhe paise nahi aale

    1. Mi ajun parent kontis skim ghetali nahi pan mala ladakya bahini cha fom bharatecha aahe pan te aap banda jhale kahi paryay to saga

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *