रेशन कार्डसाठी करावी लागणार ऑनलाईन केवायसी : Ration Card kyc online Maharashtra
Ration Card kyc online Maharashtra : राज्य सरकारने आता रेशनचे धान्य घेणाऱ्या ग्राहकांना आता ई-केवायसी/ekyc करणे बंधनकारक केले आहे. केवायसी(KYC) केली नाही तर रेशन धान्य मिळणे बंद देखील होऊ शकते.
रेशन कार्ड केवायसी माहिती
आता प्रत्येक रेशन कार्ड धारकाला रेशन कार्डची E- केवायसी करावी लागणार आहे. केवायसी करण्यासाठी रेशन कार्ड मधील व्यक्तीचे आधार कार्ड लागणार आहे. काही मिनिटामध्ये केवायसी करता येणार आहे. केवायसी केल्यानंतरच पुढील काळामध्ये लाभार्थींना धान्य वितरण केले जाणार आहे. रेशन कार्डधारकांच्या सर्व सदस्यांना स्वस्त धान्य दुकानदारांकडे जाऊन रेशन कार्डची E-केवायसी करावी लागणार आहे. e-kyc करण्यासाठी आधार कार्ड व स्वत : लाभार्थी उपस्थित असणे आवश्यक आहे.
केवायसी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मोबाईल नंबर
रेशन कार्डची केवायसी (KYC) कुठे करावी?
रेशन कार्ड धारक रेशनकार्डची केवायसी स्वस्त धान्य दुकानदारांकडे (रेशन धान्य वितरण दुकानदाराकडे) करू शकतात.