स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रुफ टाॅप (SMART) सोलर योजना 2025: पात्रता, अनुदान आणि संपूर्ण माहिती

SMART SOLAR YOJANA MAHARASHTRA

महाराष्ट्र शासनाने पारंपारिक विजेवरील अवलंबित्व कमी करून पर्यावरण पूरक उर्जेला चालना देण्यासाठी स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रुफ टाॅप (SMART) सोलार योजना 2025 (SMART Solar Yojana) लागू केली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेद्वारे स्वयंपूर्ण बनवणे आणि त्यांना उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे.

Swayampurn Maharashtra Aawasiy Roof Top Yojana

महाराष्ट्रातील वाढते औद्योगीकरण आणि शहरी करणामुळे पारंपारिक विजेची मागणी वाढत आहे. कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वू यासारख्या मर्यादित उर्जा स्त्रोतांचा वापर केल्याने प्रदूषण आणि हवामान बदलाचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे भारताने ग्लासगो येथे झालेल्या COP26 परिषदेच्या वेळी 500 गिगावॅट अपारंपरिक ऊर्जानिर्मितीचे लक्ष ठेवले आहे.

शासन निर्णयपहा

या अनुषंगाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना सुरु केली असून त्यात महाराष्ट्रासाठी 8.75 लाख घरांवर सौर प्रणाली बसविण्याचे उद्दिष्ट आहे. त्या योजनेला पूरक म्हणून राज्य सरकारने SMART योजना सुरु केली आहे.

SMART सोलर योजनेअंतर्गत अनुदानाचे तपशील

राज्य शासनाने या योजनेसाठी 2025-26 मध्ये ₹ 330 कोटी आणि 2026-27 मध्ये ₹325 कोटी, अशा एकूण ₹655 कोटींची तरतूद केली केली आहे. हि योजना 5 लाख घरगुती ग्राहकांना लाभ देणार आहे. 2 किलोवट पर्यंत च्या सौर उर्जा प्रकल्पाला ६०% अनुदान असणार आहे. तसेच 2 किलोवट ते 3 किलोवट क्षमता असणाऱ्या सौर उर्जा प्रकल्पांना बेंचमार्क किमतीच्या ४० % अनुदान देण्यात येत आहे.

  • दारिद्य्र रेषेखालील (BPL) ग्राहक: 1,54,622
  • 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणारे दुर्बल ग्राहक: 3,45,378

अनुदानाचा लाभार्थी हिस्सा पुढीलप्रमाणे असणार आहे.

ग्राहकाचा प्रकारग्राहकाचा हिस्सा
दारिद्र्यरेषेखालील ग्राहक2,500
100 युनिटपेक्षा कमी वापर असणारे सर्वसाधारण गट10,000
अनुसूचित जाती-जमाती गट5,000 ते 15,000

स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रुफ टाॅप (SMART) सोलर योजनेचे उद्दिष्ट

  • दारिद्र्य रेषेखालील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना सौर ऊर्जेद्वारे स्वयंपूर्ण बनवणे.
  • सरू ऊर्जेद्वारे उत्पन्नाचा अतिरिक्त स्त्रोत उपलब्ध करून देणे.
  • राज्यातील छतावरील सौर उर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे.
  • साठनिक रोजगाराच्या संधी निर्माण करणे अर्थव्यवस्थेला चालना देणे.

SMART सोलर योजना पात्रता व निकष

  • अर्जदाराकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने आधी कोणत्याही सौर योजनेचे अनुदान घेतलेले नसावे.
  • राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
  • ग्राहक थकबाकीमुक्त असावा.
  • मागील वर्षातील (ओक्टोंबर 2024 ते 2025) वीज वापर 100 युनिटपेक्षा जास्त नसावा.
  • फक्त सिंगल फेज वीज ग्राहकांनाच योजना लागू असेल.
  • दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना प्राधान्याने लाभ, आणि उर्वरित ग्राहकांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर लाभ मिळेल.

योजनेचा कालावधी व अंमलबजावणी

  • कालावधी मार्च 2027 पर्यंत
  • अंमलबजावणी संस्था: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण)

SMART सोलर योजनेचे फायदे

  • वीजबिल शून्यापर्यंत कमी करण्याची संधी
  • उर्वरित वीज विकून अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याची संधी
  • पर्यावरण पूर्वक उर्जेला प्रोत्साहन
  • ग्रामीण व शहरी भागातील उर्जा स्वावलंबन

Similar Posts

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *