Ladki Bahin Yojana : आता 1500 रु नाही फक्त 500 रु मिळणार या महिलांना

ladki Bahin Yojana Installment

ladki Bahin Yojana Installment | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसंदर्भात महत्वाची माहिती आता लाडकी बहिण योजनेतील या महिलांना दीड हजार ऐवजी मिळणार फक्त ५०० रुपये ? कोणत्या महिलांना मिळणार ५०० रुपये पहा सविस्तर माहिती.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) राज्यात जुलै २०२४ पासून राबिविली जात आहे. योजनेमधून पात्र लाभार्थी असणाऱ्या महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार दिले जातात, योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ऑनलाईन अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला होता, राज्यातील अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले असून पात्र लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रू मिळत आहेत. परंतु मागील हप्त्याचे काही महिलांना दीड हजार ऐवजी फक्त ५०० रुपये जमा झाले आहेत. कारण ज्या महिलांना दीड हजार रुपये ऐवजी फक्त ५०० रुपये जमा झाले आहे अशा महिलांना नमो शेतकरी योजनेचे २००० रुपये हप्ता मिळत असल्यामुळे त्यांना ५०० रुपये जमा झाले आहेत.

तसेच काही महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत असल्यामुळे मागील महिन्याचे १५०० रुपये मिळाले नाही. कारण शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतून ज्या महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ मिळत आहे अशा महिलांना वगळण्यात आले आहे.

Ladki Bahin Yojana 500 ruppes

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून लाभ घेणाऱ्या महिला लाभार्थी साठी शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळत आहे अशा महिलांना १५०० रुपये ऐवजी ५०० रुपये मिळणार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *