ई पीक पाहणी कशी करायची पहा राज्यात पिक पाहणी झाली सुरु e pik pahani online registration

e pik pahani kashi karavi

शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आता e pik pahani maharashtra राज्यात १ ऑगस्ट पासून e pik pahani करण्यास सुरुवात झाली आहे. आपल्या शेतात पेरणी केलेल्या पिकाची शेतकऱ्यांनी ई पिक पहाणी करणे गरजेचे आहे. शेतकऱ्याने पेरणी केलेल्या पिकाची माहिती शासनाला देण्यासाठी मागील चार वर्षापासून राज्यात e pik pahani ची प्रणाली सुरु केलेली आहे. यालेखात आम्ही e pik pahani kashi karaychi याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.

ई पीक पहाणी नोंदणी 2025 काय आहे?

शेतकऱ्यांना शेतातील पिकाची नोंद हि सहज व सोप्या पद्धतीने शेतामधूनच करता यावी यासाठी ई पीक पहाणी pik pahani online प्रणाली सुरु केली आहे. शेतकरी आपल्या शेतातील पिकाची माहिती हि ७/१२ उताऱ्यावर करणे आवश्यक आहे. ७/१२ उतारा वरती पेरणी केलेल्या पिकाची नोंद केल्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच याचा उपयोग होणार आहे. शेतकऱ्यांना पिक कर्ज काढण्यासाठी ७/१२ उताऱ्यावर पिकाची नोंद असणे आवश्यक असते. अन्यथा पिक कर्ज मिळण्यास अडचण येते. त्याच बरोबर शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ७/१२ उताऱ्यावर नोंद असावी लागते.

ई पिक पहाणी करणे म्हणजेच शेतातील पिकाची नोंद करणे होय. त्याच बरोबर शेतकऱ्यांना शेतातील झाडांची, पिकाची, विहीर, बोअरवेल, शेततळे, वहीत पड, कायम पड अशा ७/१२ संबधित विविध नोंदी शेतकरी मोबाईल अँप e peek pahani मधून करू शकतात.

राज्यात १ डिसेंबर पासून ई पिक पहाणी सुरु झालेली आहे. पिक पहाणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्लेस्टोर वरून e pik pahani app अपडेट करून घ्यावे. अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिक विमा भरलेला आहे. नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकऱ्याचे पिकाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर नोंद केलेली असेल तर शेतकऱ्याला संबधित विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळू शकते. यासाठी शेतकऱ्याने ई पिक पहाणी करणे गरजेचे आहे.

ई पीक पहाणी नोंदणी कशी करावी?

e pik pahani kashi karavi नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्याने ज्या गटामधील पिकाची नोंद करायची आहे त्या गटामध्ये जावून नोंद करावी लागणर आहे. म्हणजेच शेतकरी नोंद करीत असताना त्या गटामध्ये जावून नोंद करावी लागेल. शेतकऱ्यांसाठी ई पिक पहाणी करण्यासाठी शासनाने दोन पर्याय उपलब्ध करून दिलेले आहे.

  1. शेतकरी स्वतः मोबाईल वरून ई पिक पहाणी अँप मध्ये नोंदणी करून पिक पहाणी करू शकतात.
  2. ई पिक पहाणी सहाय्यक यांच्याद्वारे सुद्धा पिक पहाणी शेतकरी करू शकतात.
  • शेतकऱ्यांनी पिक पहाणी करण्यासाठी सर्वप्रथम मोबाईल मध्ये ई पिक पहाणी अँप e peek pahani app डाऊनलोड करून घ्यावे.
  • त्यानंतर आपण जर यापूर्वी कधी ई पिक पहाणी अँप मध्ये नोंदणी केली नसेल तर सर्वप्रथम नोंदणी/रजिस्ट्रेशन करावी लागेल.
  • नोंदणी झाल्यानंतर अँपमध्ये लॉगइन करून शेतकरी पिक पहाणी करू शकतात.

E pik pahani Last Date

शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामातील ई पिक पहाणी करण्यासाठी 1 डिसेंबर 2024 पासून शासनाने रब्बी हंगामातील पिक पहाणी नोंदणी सुरु केली आहे. पिक पहाणी करण्याची अंतिम मुदत 15 जानेवारी 2025 पर्यंत असणार आहे. तसेच संपूर्ण वर्षातील पिकाची नोंद (उदा.ऊस, कायम पड नोंद/चालू पड नोंद) करायची असल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण वर्षामध्ये कधीही नोंद करता येणार आहे. परंतु रब्बी हंगामातील 2024-25 मधील ई पिक पहाणी करण्यासाठी rabbi e pik pahani last date 2025, १५ जानेवारी २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Similar Posts

2 Comments

  1. Already submitted physical copy of the form with proper document. First received the message application no MUAN…. submitted successfully, but next day received message again that provisionally rejected do necessary compliance and resubmit the application. This is been done on 30th August. This statement is means what to do now.

    1. आपल्या अर्जामध्ये काही त्रुटी आली असल्यास आपण फॉर्म ज्या ठिकाणी भरला आहे, तेथे जावून अर्जाचे स्टेट्स चेक करावे,अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास कागदपत्रे व माहितीची पूर्तता करावी. आपला अर्ज मंजूर झाल्यानंतर पैसे मिळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *