बियाणे अनुदान योजना 2025 अर्ज सुरु : Biyane Anudan Yojana 2025

Biayne Anudan Yojana Maharashtra

Biyane Anudan Yojana : शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी, खरीप हंगाम २०२५ करिता राज्यातील शेतकऱ्यांना १००% अनुदानवर बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे.

Biyane Anudan Yojana

शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध उपयोगी योजना राबविल्या जातात, योजनेमधून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. आता शेतकऱ्यांसाठी अनुदानामध्ये बियाणे दिली जाणार आहेत, यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज भरण्यासाठी शासनाने महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महाडीबीटी पोर्टल वर बियाणे अनुदान करिता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

खरीप हंगाम 2025 करीता MahaBDT Farmer Scheme (महाडीबीटी शेतकरी योजना) पोर्टल वर प्रात्यक्षिक/प्रमाणित बियाणे अनुदान घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, मुग, उडीद, मका, बाजरी, भात इ. महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज भरता येणार आहे.

Biyane Anudan Yojana last date

बियाणे अनुदान योजना अर्ज करण्याची अंतिम मुदत ०२ जून २०२५ असणार आहे. व बियाणे अनुदान योजनेची सोडत ३ ते ५ जुन २०२५ या दरम्यान होईल.

Biyane Anudan Maharashtra

महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने सादर केलेले अर्ज हे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने बियाणे सोडत साठी ग्राह्य धरले जातील, तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबर वरती निवडीचा SMS दिला जाईल. आणि निवड झालेल्या लाभार्थींनाच अनुदानित बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी विहित कालावधी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज भरण्यासाठी वेबसाईट : https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin

बियाणे अनुदान योजना आवश्यक कागदपत्रे

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी शेतकऱ्याकडे फार्मर आयडी-Farmer ID असणे गरजेचे आहे, फार्मर आयडी नसेल तर सर्वप्रथम फार्मर आयडी काढून घ्यावा लागेल.

  • फार्मर आयडी-Farmer ID
  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र

Similar Posts

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *