एकाच अर्जाद्वारे घ्या अनेक योजनांचा लाभ : MahaDBT Farmer scheme

Maha DBT Farmer Scheme Maharashtra

शेतकरी मित्रांसाठी महत्वपूर्ण माहिती, अनेकदा आपल्याला शासना मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळे अर्ज भरून द्यावे लागतात. शिवाय योजनेचा अर्ज भरताना प्रत्येक वेळी सर्व कागदपत्रे अर्जासोबत द्यावी लागतात. यामुळे लाभार्थीला कागदपत्रे जुळवणे तसेच अर्ज भरण्यासाठी विविध अडचणी येतात. परंतु शेतकऱ्यांनी आता काळजी करण्याची कसलीही गरज नाही, योजनेचा लाभ घेण्यासाठी आता एकाच अर्जामध्ये अनेक योजनांसाठी अर्ज भरता येणार आहे. तेही ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या या योजनांसाठी अर्ज भरता येणार आहे.

MahaDBT Farmer Scheme Maharashtra

शेतकऱ्यांना एकाच अर्जामध्ये अनेक योजनासाठी अर्ज करण्यासाठी शासनाने शेतकरी महाडीबीटी पोर्टल सुरु केलेले आहे. या पोर्टलद्वारे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त काही कागदपत्राची आवश्यकता असते. एकदा माहिती (प्रोफाईल) भरल्यानंतर प्रत्येक वेळेस अर्ज भरताना प्रोफाईल भरण्याची तसेच नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. एकदा रजिस्ट्रेशन नोंदणी केल्यानंतर पुन्हा अर्ज करताना नवीन रजिस्ट्रेशन करावे लागणार नाही.

शेतकरी महाडीबीटी (MahaDBT Farmer Scheme Portal) पोर्टल वरती शेतकरी खालील योजनांसाठी अर्ज करू शकतात.

  • ठिबक सिंचन योजना
  • तुषार सिंचन योजना
  • पाईप, इलेक्ट्रिक मोटर, डीजेल इंजिन
  • शेततळे, शेततळ्यातील अस्तर
  • ट्रँक्टर, पॉवर टिलर
  • मनुष्य चलित औजारे व यंत्र
  • स्वयंचलित औजारे
  • ट्रँक्टर चलित औजारे व यंत्र
  • फळबाग लागवड योजना
  • कांदाचाळ अनुदान योजना
  • कडबा कुट्टी मशीन योजना

अशा अनेक योजनांसाठी शेतकरी अर्ज करू शकतात, https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer या वेबसाईट वरती अर्ज करता येणार आहे. तसेच अर्ज शेतकरी जवळील आपले सरकार सेवा केंद्र, ऑनलाईन सुविधा केंद्र, CSC याठिकाणी जावून अर्ज करू शकतात.

अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्याकडे खालील कागदपत्रे असावेत.

  • आधार कार्ड झेरॉक्स
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • जात प्रमाणपत्र (SC / ST) असल्यास
  • मोबाईल नंबर
  • 7/12 उतारा, ८ अ

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *