“लाडकी बहिण योजना” या महिलांचा लाभ बंद : Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण राज्यात सुरु झाल्यानंतर अनेक महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत, यामध्ये शासनाच्या असे निदर्शनास आले आहे कि, लाडकी बहिण योजनेत अनेक लाभार्थी महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र असून देखील योजनेचा लाभ घेत आहेत. यामुळे शासनाने अर्जाची तपासणी प्रक्रिया सुरु केलेली असून अनेक लाभार्थी महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरत आहे.
Ladki Bahin Yojana Stopped
यामध्ये अनेक महिलांचे वार्षिक उत्पन्न हे २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असून देखील, त्या या योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती समोर आल्यानंतर शासनाने याची छाननी सुरु केली, आयकर विभागाच्या अखत्यारीत असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) लाभार्थी महिलांची आपल्याकडील माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे, यामुळे ज्या महिला Income Tax Return फाईल (आयकर परतावा) भरत आहेत, अशा महिलांची लवकरच यादी तयार करून त्यांना मिळणारा लाडकी बहिण योजनेचा लाभ बंद करण्यात येणार आहे.
योजना सुरु झाल्यानंतर शासनाने योजनेच्या अटी व शर्ती याबद्दल माहिती दिलेली होती, त्यामध्ये अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, हि अट होती. मात्र अनेक अर्जदार महिला कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांनी देखील अर्ज भरलेले आहेत.
Ladki Bahin Yojana Maharashtra
तसेच लाडकी बहिण योजनेत काही महिला या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत, हे शासनाच्या निदर्शनास आले असून अशा महिलांची सुद्धा छाननी सुरु आहे, यामुळे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना देखील लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार नाही, संजय निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे देखील १५०० रुपये बंद केले जाणार आहेत. मागील काही दिवसा पूर्वी मे महिन्याचा हप्ता शासनाने लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे.
लाडकी बहिण योजनेचा मे महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये पैकी काही महिलांचे खात्यात फक्त ५०० रुपये जमा झाले आहेत, कारण ज्या महिलांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या योजनेचा लाभ मिळत आहे अशा महिलांना फक्त ५०० रुपये मिळणार आहेत.
या महिलांना मिळणार नाही लाडकी बहिण योजनेचा लाभ
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर.
- लाभार्थीचे वय २१ ते ६५ दरम्यान नसेल तर.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स (आयकरदाता) भरणारा असेल तर.
- ट्रॅक्टर वगळून इतर कोणतेही चारचाकी वाहन कुटुंबातील सदस्याच्या नावावर असेल तर.
- लाभार्थी महिला शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या इतर विभागाच्या आर्थिक योजनेतून १५०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर.
- कुटुंबातील सदस्य विद्यमान माझी खासदार/आमदार असेल तर.
- कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत.