लाडकी बहिण या लाभार्थ्यांना करता येणार पुन्हा KYC : Ladki Bahin Yojana Re kyc Online

ladki bahin yojana re ekyc

Ladki Bahin Yojana Re kyc Online : लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी कारण, लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना पुन्हा केवायसी करता येणार आहे. कारण ज्या महिलांनी केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला आहे अशा लाभार्थ्यांना आता पुन्हा केवायसी (KYC) करता येणार आहे.

लाडकी बहिण योजना केवायसी अपडेट

लाडकी बहिण योजनेतून लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. यामुळे लाभार्थी महिलांना आर्थिक मदत मिळत आहे. योजना सुरु झाल्यापासून लाभार्थी महिलांना नियमित हप्ते मिळत होते.परंतु योजनेमध्ये अनेक लाभार्थी हे योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत हे शासनाच्या निदर्शनास आले, यामुळे शासनाने प्रत्येक लाभार्थी महिलांना केवायसी करणे बंधनकारक केले होते. (पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे १२ हजार रुपये हवे असतील तर आजच हे काम करा)

योजनेमध्ये लाभ घेतलेल्या अनेक लाभार्थी महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली तसेच ज्या महिलांनी केवायसी केली नाही अशा महिलांना मिळणारे हप्ते बंद झाले. तसेच ज्या महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असून देखील त्यांच्याकडून केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला गेला यामुळे त्या महिलांचे देखील पैसे बंद झाले होते.

हे शासनाच्या निदर्शनास आले यामुळे शासनाकडून अशा लाभार्थ्यांसाठी पुन्हा केवायसी प्रक्रिया सुरु केली आहे. ज्या लाभार्थ्यांचा हप्ता बंद झाला आहे किंवा केवायसी करताना काही चूक झाली असेल तर अशा लाभार्थी महिलांनी पुन्हा केवायसी करावी. अशा लाभार्थी महिलांना पुन्हा केवायसी करण्याची संधी मिळाली आहे.

लाभार्थी https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc या वेबसाईट वरून केवायसी करू शकतात.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *