पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता या तारखेला मिळणार : PM Kisan Yojana 20th Installment Date

PM Kisan Yojana 20th Installment Date : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर दोन हजार रुपयाचा हप्ता जमा होणार आहे. कधी जमा होणार दोन हजार रुपयाचा हप्ता पहा सविस्तर माहिती.
PM Kisan Yojana 20th Installment Date
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (pm kisan samman nidhi yojana) योजनेमधून पात्र लाभार्थी महिलांना दर वर्षी सहा हजार रुपये दिले जातात, आता पर्यंत योजनेच्या लाभार्थ्यांना योजना सुरु झाल्यापासून १९ हप्ते मिळाले आहेत म्हणजेच ३८ हजार रुपये मिळाले आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी शेतकऱ्याकडे आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, सर्वात महत्वाचे कागदपत्र म्हणजे फार्मर आयडी/शेतकरी ओळख क्रमांक तसेच ७/१२, ८अ व फेरफार इ. कागदपत्रे असणे आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार?
शेतकऱ्यांना पीकिसान योजनेचा २० वा हप्ता जून च्या शेवटच्या आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे तसेच पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्याचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे आवश्यक आहे. तसेच लाभार्थी शेतकऱ्याने आपली ई-के वायसी केलेली असावी आणि फार्मर आयडी काढणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेमध्ये लिंक नाही अशा लाभार्थी शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळणार नाही.