लाडकी बहिण योजना eKYC मुदतवाढ 2026 : आता 30 एप्रिल पर्यंत संधी लगेच करा दुरुस्ती

ladki bahin yojana ekyc date

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत eKYC दुरुस्तीची अंतिम तारीख वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या लाभार्थी महिलांची KYC करताना चूक झाली असेल, चुकीचा पर्याय निवडा गेला असेल त्या लाभार्थी महिलांसाठी हि खूप मोठी बातमी आहे.

eKYC मुदतवाढ का देण्यात आली?

राज्यातील महिलांनी लाडकी बहिण योजना eKYC करताना चुकीचा पर्याय निवडला गेला होता, यामुळे त्यांना मिळणारा योजनेचा लाभ बंद झाला होता, हि बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शासनाकडून लाभार्थींना केवायसी दुरुस्तीची संधी देण्यासाठी अंतिम तारीख 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

नवीन अंतिम मुदत: 31 मार्च 2026 ऐवजी आता 30 एप्रिल 2026 पर्यंत eKYC दुरुस्त करता येईल.

eKYC दुरुस्ती ऑनलाईन कशी करावी?

खालील सोप्या पद्दतीने तुम्ही घरबसल्या eKYC दुरुस्ती करू शकता.

  1. अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc
  2. आधार क्रमांक आणि CAPTCHA कोड टाका, नंतर मी सहमत आहे वर क्लिक करा.
  3. OTP पाठवा बटनावर क्लिक करा – आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर 6 अंकी OTP येईल.
  4. OTP टाका आणि सबमिट करा.
  5. विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची अचूक उत्तरे पर्याय काळजीपूर्वक निवडा.
  6. सर्व माहिती तपासून अंतिम सबमिट करा बटन वरती क्लिक करा. आपली KYC पूर्ण होईल.
  7. अशा प्रकारे आपण KYC प्रक्रिया पूर्ण करू शकता.

KYC करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
  • आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर

महत्वाच्या सूचना – KYC करताना खालील चुका करू नका.

  • सर्व माहिती भरताना अत्यंत काळजीपूर्वक भरा.
  • प्रश्नांची उत्तरे पर्याय बरोबर निवडा.
  • चुकीचा पर्याय निवडल्यास लाभ बंद होऊ शकतो.
  • 30 एप्रिल ची वाट न पाहता लवकर KYC करून घ्यावी.
  • OTP कोणालाही शेअर करू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

लाडकी बहिण योजना eKYC दुरुस्तीची नवीन तारीख काय आहे?

शासना eKYC दुरुस्तीची मुदत 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढविली आहे.

eKYC न केल्यास काय होईल?

KYC दुरुस्त न केल्यास 1500 चे मासिक हप्ते मिळणार नाही.

KYC करण्यासाठी कुठली वेबसाईट वापरावी?

फक्त अधिकृत वेबसाईट – https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc

KYC मोबाईल वर करता येते का?

हो, मोबाईल वर ब्रावझरमधून https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc उघडून eKYC करता येते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *