या योजनेसाठी आता 7/12, 8अ लागणारच नाही : Mahadbt farmer

MahaDBT Farmer Scheme : शेतकऱ्यांसाठी शासनाकडून विविध शासकीय योजना राबविल्या जातात, योजनेमधून लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याला अनुदान दिले जाते. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. आता शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी 7/12, 8अ देण्याची गरज लागणार नाही, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मग अर्जासोबत कोणती कागदपत्रे द्यावी लागतील.
MahaDBT Farmer Scheme Maharashtra
महाडीबीटी पोर्टल वरून शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे, योजनेचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्याला 7/12, 8अ उतारा देण्याची आवश्यकता नाही. कारण आता शेतकरी योजनांचे अर्ज भरण्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक केला आहे. तसेच महाडीबीटी पोर्टल वरती अर्ज करण्यापासून ते योजनेचा लाभ मिळेपर्यंत कोणताही 7/12, 8अ उतारा देण्याची आवश्यकता नाही.फार्मर आयडीमुळे शेतकऱ्याचे सर्व 7/12, 8अ उतारे फार्मर आयडी सोबत जोडले गेलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी 7/12, 8अ उतारा देण्याची आवश्यकता नाही.
कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी निवड प्रक्रिया सुरु झालेली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल वरती योजनेचा अर्ज भरण्यासाठी सातबारा उतारा लागत असे त्याचबरोबर योजनेमध्ये निवड झाल्यानंतर सुद्धा कागदपत्रे अपलोड करताना सातबारा उतारा सोबत जोडावा लागत असे, आता इथून पुढे शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करताना सातबारा उतारा अपलोड करण्याची गरज नाही.
MahaDBT Farmer Registration
महाडीबीटी पोर्टल वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी 7/12, 8अ उतारा देण्याची आवश्यकता नाही. त्याच बरोबर महाडीबी पोर्टल वरती अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे फक्त फार्मर आयडी असणे आवश्यक आहे, महाडीबीटी पोर्टल वरती रजिस्ट्रेशन करण्यासाठी बँक पासबुक, 7/12, 8अ लागणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेणे अधिकच सोपे झाले आहे. आता शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेयचा असल्यास शेतकऱ्याकडे फक्त फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.