City Survey Utara Online : सिटी सर्व्हे उतारा असा काढा मोबाईलवरून
City Survey Utara Online : अनेकदा आपल्याला विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच कर्ज प्रकरण करण्यासाठी CTS Utara लागतो. सिटी सर्व्हे उतारा काढण्यासाठी आपल्याला यापूर्वी उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करावा लागत असे. परंतु आता काळजी करण्याची गरज नाही. घरबसल्या मोबाईल वरून आपण घराच्या जागेचा सिटी सर्व्हे उतारा काढू शकता, उतारा काढण्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही.
City Survey Utara Online Maharashtra
सिटी सर्व्हे उतारा आपण ऑनलाईन पद्धतीने मोबाईल वरून काढू शकता, यासाठी कोणत्याही कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही. CT Survey Utara नावावरून काढू शकतात, तसेच सिटी सर्व्हे उतारा C.T.S नंबर वरून काढू शकतात. सिटी सर्व्हे उतारा ऑनलाईन डिजिटल स्वाक्षरी सहित ऑनलाईन काढता येईल, जर आपल्याला उतारा फक्त पाहण्यासाठी लागत असेल तर विना सहीचा उतारा आपण काढू शकता. परंतु कर्ज प्रकरणासाठी, होम लोन साठी जर उतारा लागत असेल तर सहीचा उतारा लागेल. सिटी सर्व्हे उतारा म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड property card utara/मालमत्ता पत्रक होय. सिटी सर्व्हे नंबर आपल्याला माहिती नसेल तर आपण ऑनलाईन मोबाईल वरून हा नंबर काही मिनिटामध्ये शोधू शकता.
सिटी सर्व्हे उतारा-डिजिटल प्रॉपर्टी कार्ड संबधित माहिती
डिजिटल सहीचा उतारा उतारा काढण्यासाठी शासनाने संकेस्थळ उपलब्ध करून दिले आहे. परंतु डिजिटल सहीचा उतारा काढण्यासाठी शुल्क भरावे लागते, म्हणजेच उतारा डाउनलोड करण्यासाठी काही शुल्क द्यावे लागते. विना सहीचा उतारा काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. डिजिटल स्वाक्षरीत प्रॉपर्टी कार्ड /सिटी सर्व्हे उतारा काढण्यासाठी https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr शासनाने या संकेतस्थळावर पर्याय उपलब्ध करून दिला आहे. परंतु डिजिटल सहीचा उतारा काढण्यासाठी आपल्याला CTS नंबर माहिती असणे गरजेचे आहे.
CTS नंबर कसा शोधावा, सिटी सर्व्हे उतारा कसा काढायचा?
सिटी सर्व्हे नंबर हा डिजिटल सहीचा उतारा काढण्यासाठी लागतो,सिटी सर्व्हे उतारा नंबर काढण्यासाठी https://bhulekh.mahabhumi.gov.in/NewBhulekh/NewBhulekh.aspx हि वेबसाईट मोबाईल मध्ये ओपन करावी.
- वेबसाईट ओपन केल्यानंतर त्याठिकाणी ७/१२ (7/12), ८ अ, मालमत्ता पत्रक Property Card व क प्रत हे पर्याय दिसतील यामधील मालमत्ता पत्रक Property Card हा पर्यायवर क्लिक करा.
- त्यानंतर आपला जिल्हा – तालुका – गाव निवडा.
- आपल्याला जर CTS नंबर माहिती नसेल तर नाव Name हा पर्याय निवडा.
- त्यानंतर ज्याच्या नावाने उतारा आहे, त्यांचे पहिले नाव चौकोनामध्ये टाकावे लागेल त्यानंतर शोधा Search या बटन वरती क्लिक करा व पुढील नाव शोधा Name Search या पर्याय वरती क्लिक कारण नाव निवडा.
- त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकावा नंतर उतारा ज्या भाषेमध्ये हवा आहे ती भाषा निवडावी व सांकेतिक क्रमांक टाकून Submit बटन वरती क्लिक करावे.
आपला सिटी सर्व्हे जागेचा उतारा आपल्याला पाहायला मिळेल, त्यामध्ये नगर भूमापन क्रमांक म्हणजेच आपला सिटी सर्व्हे नंबर होय. हा उतारा आपण पाहण्यासाठी माहितीसाठी वापरू शकता परंतु कोणत्याही कामासाठी हा उतारा चालणार नाही, त्यासाठी तुम्हाला सहीचा उतारा काढावा लागेल. आता डिजिटल सहीचा उतारा कसा काढायचा याबद्दल माहिती पुढील लेखात दिली जाईल.