तलाठी उत्पन्न दाखला कसा काढायचा : Talathi Income Certificate Pdf

Talathi Utpanna Ahwal pdf 2025 : तलाठी उत्पन्न दाखला अनेकदा आपल्याला शासकीय योजनांचा लाभ तसेच शासकीय कामासाठी, शैक्षणिक कामासाठी इ. लागतो. तलाठी उत्पन्न दाखला राज्यातील महत्वाचे असे कागदपत्र आहे. उत्पन्न दाखला Talathi Income Certificate हा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दर्शवितो. तलाठी उत्पन्न दाखला हा तलाठी (महसूल विभागामार्फत) यांच्या मार्फत दिला जातो.
Talathi Income Certificate
तलाठी उत्पन्न दाखला काढण्यासाठी आपल्याकडे तलाठी उत्पन्न दाखल्यासाठीचा अर्ज-talathi income form pdf असणे आवश्यक आहे, याठिकाणी आम्ही तुम्हाला अर्ज तसेच दाखला याची पीडीएफ फाईल दिलेली आहे. आपण ती फाईल डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून तलाठी यांचेकडे देऊन उत्पन्न दाखला काढू शकता.
तुम्हाला जर तहसीलदार यांचेकडील उत्पन्न दाखला हवा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तलाठी उत्पन्न दाखला व काढावा लागेल, व तलाठी उत्पन्न दाखला व इतर आवश्यक कागदपत्रे देऊन आपण तहसीलदार यांचेमार्फत देण्यात येणारा उत्पन्न दाखला यासाठी अर्ज करू शकता.
उत्पन्न दाखला कोणत्या कामासाठी आवश्यक असतो?
तलाठी उत्पन्न दाखला आपल्याला खालील कामासाठी लागू शकतो.
- विविध सरकारी कामासाठी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच शिषवृत्ती योजनांसाठी उत्पन्न दाखला लागू शकतो.
- शाळा व महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेसाठी
- शेक्षणिक कर्ज किंवा व्यावसायिक कर्ज प्रकरणासाठी
- अन्य सरकारी योजना अन्न सुरक्षा योजना, प्रधानमंत्री आवास योजना तसेच विविध समाज कल्याणकारी योजनांसाठी
उत्पन्न दाखला कोणाकडून मिळू शकतो?
- तलाठी उत्पन्न अहवाल pdf उत्पन्न दाखला प्रथम तलाठी प्राथमिक स्तरावर उत्पन्नाची पडताळणी केली जाते, त्यानंतर तलाठी यांचेकडून तलाठी उत्पन्न दाखला मिळतो.
- तहसीलदार यांचेकडून तहसीलदार उत्पन्न दाखला मिळतो.
तलाठी उत्पन्न दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे-Talathi Income certificate documents
- अर्जदाराचा ओळखीचा पुरावा – आधार कार्ड, मतदान कार्ड, Pan कार्ड यापैकी कोणतेही एक
- रहिवाशी पुरावा – रेशन कार्ड, रहिवाशी प्रमाणपत्र, वीज बिल यापैकी कोणतेही एक
- उत्पन्नाचा पुरावा – शेती असल्यास शेतीचा ७/१२, उतारा, पगारदार व्यक्तीसाठी वेतन प्रमाणपत्र किंवा इतर उत्पन्न असल्यास त्याची माहिती/प्रमाणपत्र.
- विहित नमुन्यातील अर्ज (परिशिष्ट
उत्पन्न दाखल्याचा कालावधी किती असतो?
उत्पन्न दाखला साधारणत: १ वर्षापर्यंत वैध असतो, त्यानंतर पुन्हा नवीन दाखल्यासाठी अर्ज करावा लागतो.
तलाठी उत्पन्न दाखला कसा काढायचा?
- उत्पन्नाचा दाखला अर्ज (परिशिष्ट ब फॉर्म ख) भरावा, अर्ज व स्वयंघोषणापत्र संबधित आवश्यक कागदपत्रे तलाठी यांचेकडे जमा करावी, त्यानंतर तुम्हाला तलाठी उत्पन्न दाखला मिळेल.
- तलाठी कार्यालयात जावून आपण तलाठी उत्पन्न दाखला काढू शकता.
तलाठी उत्पन्न दाखला PDF | डाऊन लोड |