शेततळे अनुदान योजना ऑनलाईन अर्ज सुरु; Shet tale Anudan Yojana maharashtra

Shet tale Anudan Yojana

Shet tale anudan yojana maharashtra : शेतीसाठी सर्व प्रथम पाणी हे अत्यंत महत्वाचा घटक आहे, शेती करण्यासाठी विविध साधने, औजारे व यंत्रे, पाण्याचा स्त्रोत, ओषधे , बि-बियाणे इ. गरज पडते. शेतामध्ये जर एखादे पिक घ्यायचे असेल तर सर्व प्रथम आपण आपल्याकडे उपलब्ध होणारे पाणी या वरती शेतकरी पिके घेतो. कारण पाणी हा शेतीचा मुख्य घटक आहे.

Shet tale Anudan Yojana Maharashtra

पावसाळ्यामध्ये शक्यतो विहीर, बोरवेल इ.व मध्ये -शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासत नाही. हिवाळ्यामध्ये हळूहळू पाण्याची कमतरता भासते, तर उन्हाळ्यामध्ये पिकासाठी पाणी कमी पडते. पिकाला जर वेळेवरती पाणी नाही मिळाले तर उत्पन्न कमी निघू शकते. उन्हळ्यामध्ये विहीर, बोरवेलचे पाणी कमी होऊ लागते. परंतु शेतकऱ्याने जर आपल्या शेतामध्ये शेततळे केले तर त्याचा त्याला नक्कीच फायदा होईल. शेततळ्यामध्ये पाणी साठवून ठेऊन, उन्हाळ्यामध्ये ते वापरण्यास मदत होऊ शकते. शेततळे अनुदान योजना 2024 मध्ये शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येईल. यासाठी लाभार्थी शेतकऱ्याने ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.

लाभार्थी घटकशेततळे
अर्ज करण्याची पध्दतऑनलाईन
लाभार्थीशेतकरी
अर्ज कुठे करावामहाडीबीटी शेतकरी पोर्टल
शेततळे अनुदान योजना महाराष्ट्र

शेततळे अनुदान योजना 2024 महाराष्ट्र Shettale Anudan Yojana

शासन शेतकऱ्याना शेततळे करण्यासाठी अनुदान देते. तसेच शेततळ्याचे अस्तरीकरण करण्यासाठीसुद्धा अनुदान मिळते. यामुळे शेतकऱ्याना शेततळे करण्याकरिता नक्कीच फायदा होणार आहे. या लेखामध्ये तुम्हाला शेततळे योजने बद्दल माहिती तसेच अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कुठे करावा, प्रोसेस काय आहे? याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. शेतकरी वैयक्तिक शेततळे करिता सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकतात, तसेच सामुहित शेततळे (सामाईक शेततळे ) करिता सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे .

शेततळे अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे Shet tale Yojana Maharashtra

  • आधार कार्ड झेरॉक्स
  • आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते पासबुक झेरॉक्स
  • शेतीचा ७/१२, ८ अ उतारा
  • जात प्रमाणपत्र झेरॉक्स (अनु.जाती, अनु.जमाती प्रवर्गातील असल्यास )
  • मोबाईल नंबर
  • PAN Card (असेल तर )

शेततळ्यासाठी अनुदान किती मिळेल? Shettale Subsidy In Maharashtra

  • शेततळ्यासाठी (खोदण्यासाठी) साधारण ७५ हजार रु. अनुदान मिळते .
  • शेततळे (शेततळे कागद अनुदान) अस्तरीकरणासाठी ७५ हजार रुपये अनुदान मिळते.
    • (अनुदानामध्ये शेततळे कागद तसेच आकारमानानुसार काही बदल होऊ शकतो )
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचे नावे किमान ०.६० हे.आर म्हणजेचे दीड एकर क्षेत्र असणे गरजेचे आहे.
  • अनुदान आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये (DBT) जमा केले जाईल.
  • लाभार्थी शेतकऱ्याला पूर्वसंमती पत्र मिळाल्याशिवाय काम सुरु करू नये अथवा कागद खरेदी करू नये.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *