शेतकऱ्यांना यादिवशी मिळणार 17 व्या हप्त्याचे 2000 रुपये | PM Kisan 17th Installment Date 2024
PM kisan 17th installment date 2024 : अखेर प्रतीक्षा संपली, पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे. पीएम किसान योजना अंतर्गत शेतकऱ्यांना प्रती वर्ष ६००० रु समान तीन हप्त्यामध्ये दिले जातात. ज्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही अशा शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे.
PM kisan 17th installment date 2024
दि. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी १६ हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला होता, आता लवकरच १७ वा हप्ता दि. १८ जून २०२४ रोजी पात्र लाभार्थी ९० लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणे गरजेचे आहे.
योजनेचे नाव | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना |
मिळणारा लाभ | प्रती वर्ष ६००० रुपये |
१७ व हप्ता कधी मिळणार? | १८ जून २०२४ |
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याने केवायसी/आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी राजपुरे डिजिटल & आपले सरकार सेवा केंद्र याठिकाणी जाऊन आपण आपली केवायसी करू शकता.