शेळी/मेंढी, गायी/म्हशी वाटप योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म सुरु : Navinya Purna Yojana 2025

Navinya Purna Yojana

Navinya Purna Yojana : शासनाकडून नागरिकांसाठी विविध शासकीय योजना राबविल्या जातात, त्यामध्ये शेती संबंधित योजना, महिलांसाठी योजना, तसेच विविध विभागाकडून अनेक योजना राबविल्या जातात. महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत. इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज कुठे करायचा? अर्ज भरण्याची अंतिम मुदत काय असणार आहे? तसेच अनुदान किती असणार? याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे.

नाविन्यपूर्ण योजना 2025 – Navinya Purna Yojana

नाविन्यपूर्ण योजेने अंतर्गत नागरिक खालील घटकासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

जिल्हास्तरीयराज्यस्तरीय
दुधाळ गायी/म्हशी वाटप करणेदुधाळ गायी/म्हशी वाटप करणे
तालंगा गट वाटप करणे1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपानाद्वारे कुक्कुट पालन व्यवसाय सुरु करणे
शेळी/मेंढी गट वाटप करणेशेळी/मेंढी गट वाटप करणे
एक दिवशीय सुधारित पक्षांचे पिल्लाचे गट वाटप करणे

शेळी/मेंढी, दुधाळ गायी/म्हशी गट वाटप योजनेसाठी अनुदान किती असेल?

शेळी, मेंढी गट वाटप योजनेसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थीना ७५% अनुदान असणार आहे लाभार्थीला २५% लाभार्थी हिस्सा भरावा लागेल. व सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थींना ५०% अनुदान असणार आहे लाभार्थीला उर्वरित ५०% हिस्सा भरावा लागेल.

पशुसंवर्धन विभाग यांच्यामार्फत नाविन्यपूर्ण योजना व जिल्हास्तरीय योजना या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे, तसेच नवीन अर्ज देखील सुरु झाले आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत २ जून २०२५ असणार आहे. ज्या लाभार्थींनी मागील वर्षी किंवा यापूर्वी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत अशा लाभार्थींना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. एकदा अर्ज केल्यानंतर पुढील ५ वर्ष अर्ज करण्याची गरज नाही.

नाविन्यपूर्ण योजना अर्ज करण्याची अंतिम मुदत?

२ जून २०२५ हि अर्ज करण्याची अंतिम मुदत असणार आहे. यामुळे लाभार्थीने विहित कालावधीमध्ये अर्ज करावेत.

नाविन्यपूर्ण योजना अर्ज करण्याची संपूर्ण पद्धती

navinya purna Yojana 2025

अर्जदार https://ah.mahabms.com/ या वेबसाईट वरती ऑनलाईन अर्ज Sheli Mendhi Palan Yojana Online Application करू शकतात तसेच मोबाईल App द्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Navinya Purna Yojana Documents

नाविन्यपूर्ण योजना अर्ज करण्यासाठी लाभार्थीकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • रेशन कार्ड
  • १ फोटो
  • सहीचा नमुना
  • जातीचा दाखला (SC/ST प्रवर्गातील अर्जदार असल्यास)
  • रेशन कार्ड मध्ये नावे असलेली सर्व व्यक्तींचे आधार कार्ड
  • मोबाईल नंबर
  • ७/१२, ८अ असल्यास

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *