महाडीबीटी योजना निवड प्रक्रिया सुरु, आपली निवड झाली का पहा : MahaDBT Beneficiary List

MahaDBT Farmer Beneficiary List : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, महाडीबीटी शेतकरी योजना निवड प्रक्रिया सुरु झाली आहे. योजनेमध्ये आपली निवड झाली का? आत्ताच चेक करा. यादीमध्ये नाव आहे का हे चेक करण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
MahaDBT Farmer Beneficiary List
महाडीबीटी शेतकरी योजनेमध्ये राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी मागील काही वर्षापासून ऑनलाईन अर्ज केलेले आहेत, परंतु अनेक शेतकऱ्यांची योजनेमध्ये निवड झालेली नाही, आता त्या शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण यापूर्वी महाडीबीटी पोर्टल वरील योजनेची निवड प्रक्रिया हि लॉटरी पद्धतीने होत होती आता शासनाने लॉटरी पद्धत बंद केली असून प्रथम अर्ज प्रथम निवड या पद्धतीने निवड प्रक्रिया सुरु केली आहे. यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला योजनेचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
तसेच महाडीबीटी पोर्टल वरती प्रथम अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया सुरु झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांची योजनेमध्ये निवड झाली आहे अशा शेतकऱ्यांना निवड झालेले मेसेज येत आहेत. निवड झालेल्या शेतकऱ्यांनी दिलेल्या कालावधीमध्ये संबधित योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पोर्टल वरती अपलोड करणे आवश्यक आहे. शेतकऱ्याने विहित कालावधीमध्ये जर कागदपत्रे अपलोड केली नाही तर त्या शेतकऱ्याची योजनेमधून झालेली निवड रद्द केली जावू शकते. यामुळे शेतकऱ्याने विहित कालावधी मध्ये कागदपत्रे अपलोड करावी.
महाडीबीटी योजना शेतकरी निवड यादी कशी पहायची पहा?
महाडीबीटी पोर्टल वरती निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.
- निवड झालेल्या शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी MahaDBT Farmer Selection List येथे क्लिक करा.
- आपल्यासमोर शेतकरी निवड यादी पाहण्यासाठी नवीन पेज/वेबसाईट सुरु होईल.
- त्यामधून सर्वप्रथम बाब प्रकार (Tile) निवडा.
- बाब प्रकार निवडल्या नंतर आपला जिल्हा – तालुका – गाव निवडा.
- गाव निवडल्यानंतर शोधा बटन वरती क्लिक करा.
शोधा वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या गावाची महाडीबीटी पोर्टल वरती निवड झालेल्या शेतकऱ्याची यादी mahadbt farmer selection list पाहायला मिळेल. त्यामध्ये आपले नाव आहे का? चेक करू शकता. अशा प्रकारे आपण निवड झालेल्या शेतकऱ्याची यादी पाहू शकता.