शेळी-मेंढी, गाई-म्हशी गट वाटप योजना निवड प्रक्रिया सुरु : Mahabms Yojana 2025

mahabms yojana

Mahabms Yojana 2025 : शेळी-मेंढी, गाई-म्हशी योजनेचे अर्ज केलेल्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, कारण ज्या लाभार्थ्यांनी शेळी-मेंढी, गाई-म्हशी, कुक्कुट पालन शेड, तलंगा गट वाटप करणे योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेले होते, अशा लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी एसएमएस/मेसेज येत आहेत, त्या लाभार्थ्यांनी विहित कालावधी मध्ये कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी संपूर्ण माहिती या लेखात दिलेली आहे.

Mahabms Yojana – Navinya Purna Yojana 2025

शेळी/मेंढी गट वाटप योजना, गाई/म्हशी गट वाटप योजना, एक दिवशीय सुधारित पक्षांच्या पिल्लाचे गट वाटप करणे, कुक्कुटपालन शेड इ. योजनेसाठी ज्या लाभार्थींनी अर्ज केलेले आहेत अशा लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया सुरु झाली आहे, ज्या लाभार्थ्यांना खालील प्रमाणे एसएमएस आला असेल तर दिलेल्या कालावधीमध्ये संबधित योजनेसाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करावी. ज्या लाभार्थींना एसएमएस आला नसेल त्यांनी वेबसाईट वरती लॉगइन करून कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पर्याय उपलब्ध आहे का चेक करा.

AH-MAHABMS अर्ज क्र. ****1685421 साठी कागदपत्रे अपलोड करा. Averta

पशुसंवर्धन नाविन्य पूर्ण योजना 2025 अनुदान, सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीला ५०% अनुदान दिले जाते व अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST) प्रवर्गातील लाभार्थीला ७५% अनुदान दिले जाते.

Ah Mahabms Document Upload

नाविन्यपूर्ण योजना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी ज्या लाभार्थ्यांना एसएमएस/मेसेज आले आहेत त्यांनी ८ जून २०२५ पासून १५ जून २०२५ या कालावधीमध्ये https://ah.mahabms.com/ या योजनेच्या अधिकृत पोर्टल वरती आपली कागदपत्रे अपलोड करावी. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कागदपत्राची पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर कागदपत्रामध्ये काही त्रुटी आढळल्यास लाभार्थीला कागदपत्रे त्रुटीची पूर्तता करण्यासाठी २५ जून २०२५ ते २७ जून २०२५ हि मुदत देण्यात आलेली आहे.

  • कागदपत्रे अपलोड करताना कागदपत्रे स्पष्ट अपलोड करावी.
  • कागदपत्राचा आकार हा १००kb पेक्षा जास्त नसावा.
  • कागदपत्राचा आकार १००kb पेक्षा कमी करण्यासाठी येथे क्लिक करा.
  • अपत्य स्वयंघोषणा पत्रासाठी येथे क्लिक करा.
  • रहिवाशी घोषणापत्रासाठी येथे क्लिक करा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *