लाडकी बहिण योजना e-KYC करण्यासाठी मिळाली मुदतवाढ : Ladki Bahin Yojana KYC Last Date

Ladki Bahin Yojana KYC Last Date

Ladki Bahin Yojana KYC Last Date : लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी कारण लाडकी बहिण योजनेची केवायसी करण्याची मुदत हि 18 नोव्हेंबर 2025 देण्यात आली होती परंतु आता यामध्ये वाढ केली आहे. यामुळे लाभार्थी महिलांना लाडकी बहिण योजनेची केवायसी करण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

Ladki Bahin Yojana KYC Last Date

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमधून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये दिले जात आहेत, या योजनेमधून पात्र लाभार्थी महिलांना 1500 रुपये मिळत आहेत. परंतु शासनाच्या असे निदर्शनास आले आहे कि, काही महिला लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नसून देखील योजनेचा लाभ घेत आहेत.

यामुळे शासनाने आता प्रत्येक लाभार्थीला ई-KYC करणे बंधनकारक केले आहे. ई-KYC करण्यासाठी शासनाने 18 नोव्हेंबर 2025 हि मुदत दिली होती. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे आणि अडचणीमुळे अनेक लाभार्थींना ई-केवायसी करता आली नाही, त्यामुळे राज्य शासनाने हि महत्वपूर्ण मुदतवाढ दिली आहे.

लाडकी बहिण योजनेची KYC करण्यासाठी शासनाने 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. यामुळे लाभार्थीनी दिलेल्या कालावधीमध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. ज्या महिला KYC प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत अशा महिलांना योजनेचा हप्ता म्हणजेच 1500 रुपये मिळणार नाहीत. यामुळे प्रत्येक लाभार्थी महिलेने ई केवायसी करणे गरजेचे आहे.

KYC करणे आवश्यक आहे का?

लाडकी बहिण योजनेची KYC करणे आवश्यक आहे कारण जर आपण लाडकी बहिण योजनेची केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर योजनेचा लाभ मिळणार नाही आणि पुढील मिळणारा हप्ता देखील मिळणे बंद होईल.

लाडकी बहिण योजनेची केवायसी करण्याची शेवटची तारीख किती?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख १८ नोव्हेंबर 2025 दिली होती परंतु यामध्ये वाढ केली असून 31 डिसेंबर 2025 हि KYC करण्याची शेवटची तारीख असणार आहे.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *