लाडकी बहिण योजना KYC अशी करा : Ladki Bahin Yojana KYC

Ladki Bahin Yojana KYC : सर्व लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्वाची माहिती कारण आता प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी करावी लागणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची हि केवायसी प्रक्रिया पूर्ण केली तरच योजनेचा आर्थिक लाभ मिळणार आहे.
Ladki Bahin Yojana KYC
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची केवायसी करणे बंधनकारक आहे. ज्या महिला केवायसी करणार नाहीत अशा महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही, तसेच आता लवकरच लाभार्थी केवायसी प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. केवायसी प्रक्रिया सुरु झाल्यानंतर प्रत्येक लाभार्थी महिलेने केवायसी करणे गरजेचे आहे. लाभार्थी महिला https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc या वेबसाईट वरून ekyc करू शकतात. महिलांना घर बसल्या मोबाईल वरून KYC करता येणार आहे.
लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होण्यासाठी लाभार्थी महिलेचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक असणे गरजेचे आहे. आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल तर अशा लाभार्थी महिलांना योजनेचे पैसे जमा होणार नाहीत. लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिला हि महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे. तसेच त्या महिलेचे कुटुंबाचे आर्थिक वार्षिक उत्पन्न हे २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असावे.
लाडकी बहिण योजनेची केवायसी कशी करायची?
- सर्वप्रथम लाडकी बहिण योजनेचे https://ladakibahin.maharashtra.gov.in/ पोर्टल ओपन करा.
- वेबसाईट ओपन झाल्यानंतर खालील प्रमाणे तुम्हाला केवायसी करण्यासाठी पर्याय दिसेल.

- “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात” हा पर्याय निवडा.
- त्यानंतर आपल्यासमोर नवीन पेज सुरु होईल. त्यामध्ये लाभार्थी महिलेला आधार कार्ड नंबर टाकण्यासाठी पर्याय उपलब्ध असेल. त्यामध्ये आधार कार्ड नंबर टाकावा.

- Captcha कोड टाका आणि मी सहमत आहे हा पर्याय निवडून ओटीपी पाठवा वरती क्लिक करा.
- ओटीपी पाठवा वरती क्लिक केल्यानंतर आधार कार्ड ला लिंक असणाऱ्या मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल तो ओटीपी टाकून सबमिट करा.
- पुन्हा तुम्हाला वडिलांचा/पतीचा आधार क्रमांक टाकण्यासाठी नवीन पेज ओपन होईल.
- त्याठिकाणी पतीचा आधार क्रमांक टाकून घ्या.
- Captcha कोड टाका आणि मी सहमत आहे हा पर्याय निवडून ओटीपी पाठवा वरती क्लिक करा.
- ओटीपी पाठवा वरती क्लिक केल्यानंतर पतीच्या/वडिलांच्या आधार कार्ड ला लिंक असणाऱ्या मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल तो ओटीपी टाकून सबमिट करा.
- लाडकी बहिण योजना KYC चे काही पर्याय ओपन होतील.
- त्यामधून योग्य ते पर्याय निवडून फॉर्म सबमिट करा.
अशा प्रकारे आपण मोबाईल वरून केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.
केवायसी करताना खालीलप्रमाणे काळजी घ्या.
- केवायसी करताना सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा.
- एकदा केवायसी झाल्यानंतर त्यामध्ये पुन्हा बदल करता येणार नाही.
- केवायसी करण्यासाठी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.
Yes it is very good for women thank you 😊
Nice
Nice
Good