लाडकी बहिण डिसेंबर महिन्याचा हप्ता झाला जमा : Ladki Bahin December Installment

Ladki Bahin December Installment released

Ladki Bahin December Installment : लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी! कारण लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी केवायसी करण्यासाठी शासनाने ३१ डिसेंबर २०२५ हि मुदत दिली होती. यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

लाडकी बहिण योजनेचा हप्ता ३००० मिळणार का?

लाडकी बहिण योजनेचा डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता मकर संक्रांतीला मिळणार अशी माहिती आपण वाचली/पाहिली असेल. परंतु आता लाडकी बहिण योजनेचा फक्त डिसेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थी मिळणार आहे. पात्र लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता म्हणजेच १५०० रुपये DBT मार्फत थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

या महिलांना मिळणार फक्त ५०० रुपये!

लाडकी बहिण योजनेच्या काही महिलांच्या बँक खात्यात फक्त ५०० रुपये जमा होत आहेत कारण ज्या महिलांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ६००० व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे ६००० मिळत आहेत अशा महिलांना फक्त ५०० रुपये जमा होतात.

लाडकी बहिण योजनेचा हप्ता नाही मिळाल्यास काय करावे.

बऱ्याच लाभार्थी महिलांचा असा प्रश्न आहे कि त्यांना लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळत नाही. किंवा अर्ज भरला आहे परंतु आता पर्यंत एकहि हप्ता मिळाला नाही. सुरुवातीला पैसे मिळाले पण नंतर बँक खात्यात जमा झाले नाही तर अशा महिलांनी आपण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहोत का हे चेक करा. खालील गोष्टी नक्की तपासा.

  • सर्व प्रथम आपला अर्ज मंजूर आहे का? म्हणजेच Approved आहे का हे चेक करा.
  • आधार कार्ड कोणत्या बँक खात्याला लिंक आहे हे चेक करा.
  • आधार लिंक असेल तर ते DBT Active आहे का? चेक करा.
  • जर आधार कार्ड बँक खात्याला लिंक असेल तर बँकेत खाते चालू आहे का पहा.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *