Tractor Anudan Yojana 2024; ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म सुरु
Mahadbt tractor anudan yojana : ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु आहेत, ट्रॅक्टरसाठी अनुदान योजनेसाठी अर्ज कुठे करावा, त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात आणि Tractor Anudan Yojana साठी अनुदान किती मिळणार? याबद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.
Tractor anudan yojana 2024 ट्रॅक्टर अनुदान योजना 2024
आताची शेती म्हंटल कि मशागती साठी ट्रॅक्टर हा लागतो. काही वर्षापूर्वी बैलच्या सहाय्याने शेतीची संपूर्ण मशागत केली जायची अजूनही काही शेतकरी बैलाच्या सहाय्याने शेतीची मशागत केली जाते. अगदी पिक घरात येईपर्यत, मशागत पेरणी करण्यापासून ते पिकाची वाहतूक करण्यापर्यंत हि सर्व कामे बैलाच्या सहाय्याने करीत असे. परंतु आता शेती करायची म्हंटल कि ट्रॅक्टर आधी घेतात ट्रॅक्टरमुळे पूर्ण दिवसाचे होणारे काम हे काही तासामध्येच होते. यामुळे वेळेची बचत होते. परंतु जर ट्रॅक्टर घ्यायचा म्हंटल तर त्यासाठी खर्च जास्त येतो. परंतु शेतकऱ्याना चिंता करण्याची गरज नाही.
शासनाकडून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तसेच शेती संबधित सर्व औजारे आणि यंत्र इतर घटकासाठी मदत होते याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. Tractor Anudan Yojana योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करणे गरजेचे आहे.
MahaDBT Farmer Tractor Apply Online
महाराष्ट कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण योजना/राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शेती उपयोगी औजारे, यंत्र आणि इतर साधने खरेदी करण्यासाठी शासन अनुदान देते. योजनेमधून ट्रक्टर या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. ऑनलाईन सुविधा केंद्रावर जावून फॉर्म भरू शकतात. tractor anudan yojana maharashtra 2024 फॉर्म भरण्यासाठी आमच्या केंद्राशी संपर्क करा. अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्याने दिलेल्या मोबाईल नंबरवरती एसएमएस येईल. तसेच योजनेमध्ये निवड झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्याला एसएमएस येतो.
Tractor Anudan Online Application
ट्रॅक्टरसाठी शासनाकडून अनुदान किती मिळेल? आणि अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात? वाचा संपूर्ण माहिती. महाडीबीटी पोर्टल वरती ट्रॅक्टर या घटकासाठी शासनाकडून खालीलप्रमाणे अनुदान दिले जाते. प्रत्यक्ष अनुदानामध्ये काही बदल होऊ शकतो.
- 2WD/4WD – ट्रॅक्टर ८ BHP ते २० BHP पर्यंत असेल तर
सर्वसाधारण प्रवर्ग | अनु.जाती/अनु.जमाती प्रवर्ग/शेतकरी महिला/अल्पभूधारक शेतकरी/बहुभूधारक |
७५००० रु.पर्यंत | १००००० रु. पर्यंत |
- 2WD/4WD – ट्रॅक्टर क्षमता २० BHP ते ४० BHP पर्यंत असेल तर
सर्वसाधारण | अनु.जाती/अनु.जमाती प्रवर्ग/शेतकरी महिला/अल्पभूधारक शेतकरी/बहुभूधारक |
१ लाख रु.पर्यंत | १ लाख २५ हजार रु.पर्यंत |
- 2WD/4WD – ट्रॅक्टर ४० BHP ते ७० BHP पर्यंत असेल तर
सर्वसाधारण | अनु.जाती/अनु.जमाती प्रवर्ग/शेतकरी महिला/अल्पभूधारक शेतकरी/बहुभूधारक |
१ लाख रु.पर्यंत | १ लाख २५ हजार रु.पर्यंत |
महाडीबीटी ट्रॅक्टर योजना 2024 कागदपत्रे
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- बँक पासबुक
- ७/१२, ८अ उतारा
- मोबाईल नंबर
ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लाभार्थी शेतकरी असणे गरजेचे आहे, म्हणजेचे त्याच्या नावे ७/१२ असणे गरजेचे आहे.