महिलांना मिळणार 1500 रुपये प्रत्येक महिन्याला पहा : Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra : महिलांसाठी आनंदाची बातमी, महिलांसाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात, आता शासनाकडून राज्यातील योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. कोणत्या महिलांना १५०० रु. मिळणार, पात्रता काय असेल? अर्जाची माहिती, आवश्यक कागदपत्रे इ. संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
राज्यातील महिलांसाठी शासनातर्फे दर महिन्याला १५०० रुपये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून देण्यात येतील अशी घोषणा अर्थ संकल्पामध्ये करण्यात आली. राज्यामधील २१ ते ६० वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेमधून १५०० देण्यात येतील असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली.
योजना | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना |
राज्य | महाराष्ट्र राज्य |
योजनेची अंमलबजावणी | जुलै २०२४ पासून |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
शासन निर्णय | पहा |
राज्यातील महिलांना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी राज्य सरकारची महत्वपूर्ण अशी योजना आहे.
महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी हि योजना “Ladki Bahin Yojana” सुरु केली आहे. २१ ते ६० वयोगटातील महिला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला, निराधार महिला, विधवा, घटस्पोटीत महिला इ. दरमहा एक हजार पाचशे रुपये मिळणार आहे, यासाठी दरवर्षी ४६००० कोटी ची तरतूद करण्यात येणार आहे. या योजनेची सुरुवात जुलै २०२४ पासून होईल.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Eligibility
- किमान २१ ते ६० वयोगटातील विवाहित, घटसस्फोटीत, विधवा, परित्यक्त्या आणि निराधार महिला
- कौटुंबिक उत्पन्न २,५०,००० रु. पेक्षा कमी असावे.
- लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना कागदपत्रे
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बँक खाते पासबुक
- उत्पन दाखला (सक्षम प्राधिकारी) (रु.२.५० लाख पर्यंत)
- योजनेचे अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
- जन्म दाखला/महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
Majhi Ladki Bahin Yojana Online Apply
योजनेचा लाभ घेण्यसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे, लाभार्थी ऑनलाईन पोर्टलवरती किंवा मोबाईल App द्वारे अर्ज करू शकतात, तसेच सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र येथे जावून आपला अर्ज भरू शकतात. ऑनलाईन अर्ज सुरु झाल्यानंतर नवीन माहिती दिली जाईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लवकरच वेबसाईट पोर्टल लॉंच होईल.
Humne form submit Kiya par approve nahi hua application status bhi pending dikha raha abhi kya kare
wait kijiye sir
Hum nai form submit kiya lekin adhar upload nahi hoa fir se form bharna ho ga
Mera approved forms hai mene 16 July ko bhara hai par abhi tak pese nhi aye bank sheding bhi hai
Mera kab ka approval aa chuka hi sab documents bhi correct hai kuch missing bhi nahi but abhi tak koi paise nahi aaye. Kab tak aayenge??