ब्लॅक बॉक्स म्हणजे नक्की काय? : Black Box in Aeroplane

Black Box in Aeroplane

Black Box in Aeroplane : ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? ब्लॅक बॉक्स एक अत्याधुनिक आणि आवश्यक इलेक्ट्रोनिक उपकरण आहे, जे विशेषत: विमानामध्ये वापरले जाते, यालाच तांत्रिक भाषेत Flight Data Recorder (FDR) आणि Cockpit Voice Recorder (CVR) असेही म्हणतात.

Black Box in Aeroplane

ब्लॅक बॉक्स हे विमानाच्या संदर्भात विमानाच्या उड्डाणाची माहिती जसे कि, उड्डाणाची गती, उंची (Altitude) इंजिनची स्थिती (Engine Performance) पायलट व को पायलट यांच्यातील संभाषण आणि नियंत्रण प्रणालीतील बदल इ. माहिती साठवतो. (Black box rang) या बॉक्स ला ब्लॅक बॉक्स असे म्हणतात परंतु हा बॉक्स काळा नसून नारंगी रंगाचा असतो.जेणेकरून तो, अपघात स्थळी सहज सापडू शकेल.ब्लॅक बॉक्स हे प्रचलित नाव आहे प्रत्यक्षात मात्र त्याचा रंग हा उज्वल केशरी असतो.

ब्लॅक बॉक्स हा दोन मुख्य भागामध्ये विभागला जातो, यामध्ये FDR – Flight Data Recorder आणि CVR – Cockpit Voice Recorder. FDR मध्ये विमानाच्या टेक ऑफ पासून Landing पर्यंतची तांत्रिक माहिती जसे कि वेग दिशादर्शक कोण, इंजिन आरपीएम (RPM) इंधनप्रवाह इत्यादीगोष्टी संग्रहित करतो. व CVR मध्ये कोकपिट मधील सर्व संभाषण अलार्म आणि पार्श्वभूमी (Background Noice) रेकॉर्ड केले जाते.

विमानच्या अपघाताच्या वेळी ब्लॅक बॉक्सचा महत्वाचा उपयोग होतो.

जेंव्हा एखाद विमान कोसळत, तेंव्हा एकमेव माध्यम असत जे त्या दुर्घटनेमागच खर कारण समजून घेण्यास मदत करतं. आघाताची वेळी इंजिनची स्थिती कशी होती? पायलट चा निर्णय बरोबर होता का, कोणते तांत्रिक दोष होते का? हि सगळी माहिती तपासणाऱ्याना ब्लॅक बॉक्समुळे मिळते आणि भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यास मदत होते.

Black Box किती सुरुक्षित असतो?

ब्लॅक बॉक्स खूप मजबूत आणि अपघातप्रुफ बनवला जातो, तो ११०० डिग्री सेल्सिअस तापमान सहन करू शकतो. तसेच २०,००० फुट खोल समुद्रात ३० दिवस टिकू शकतो. आणि ३४०० G-Force चा दाब सहन करू शकतो. यामुळे अपघात झाल्यानंतरही तो बहुतेक सुरुक्षित राहतो.

ब्लॅक बॉक्स सहसा विमानाच्या शेवटच्या भागात (Tail Section) बसवलेला असतो. कारण अपघातवेळी विमानाचा शेवटचा भाग सर्वात कमी नुकसान होतो. यामुळे तो अधिक सुरुक्षित राहतो. ब्लॅक बॉक्स हा केवळ एक यंत्र नसून तो विमानाच्या सुरुक्षेचा आधारस्तंभ आहे. प्रत्येक अपघातातून शिकण्यासाठी विमान वाहतूक अधिक सुरुक्षित करण्यासाठी, आणि प्रवाशांच्या जीव वाचाविण्यासाठी ब्लॅक बॉक्स महत्वाचा ठरतो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *