12 वी चा निकाल आज जाहीर होणार, येथून पहा निकाल : HSC Maharashtra Board Results 2025

HSC Maharashtra Board Result 2025 : राज्यातील १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी बारावीचा निकाल आज दिनांक 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना उद्या निकाल मोबाईलवर पाहायला मिळेल. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 05/05/2025 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे.
HSC Result Link
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, मुंबई,नाशिक, कोल्हापूर, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत वेबसाईटवर सोमवार दिनांक ०५ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत वेबसाईट पुढीलप्रमाणे आहेत.