जिल्हा परिषद योजना सुरु, अर्ज प्रक्रिया, पात्रता : Zilla Parishad Yojana 2025

zp pune yojana, zilla parishad yojana

Zilla Parishad Yojana : जिल्हा परिषद योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले, असून नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. सदर योजना पुणे जिल्ह्यासाठी सुरु झाली असून नागरिकांना ऑनलाईन अर्ज भरता येणार येईल. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून अर्ज कुठे करायचा, योजनेबद्दल माहिती, कागदपत्रे याबद्दल सविस्तर माहिती या लेखात दिलेली आहे.

जिल्हा परिषद योजना 2025

पुणे जिल्ह्यासाठी जिल्हा परिषद स्वनिधी मधून विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहेत. यामध्ये कृषी संबधित योजना, समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, महिला व बाल कल्याण विभागामार्फत येणाऱ्या योजना, दिव्यांग कल्याण विभागामार्फत येणाऱ्या योजना त्याच बरोबर पशु संवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे सुरु झाले असून लाभार्थी अर्जदारांना https://zppunecessyojana.com/ या पोर्टल वरती ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

जिल्हा परिषद पुणे स्वनिधी पोर्टल काय आहे?

zppunecessyojana.com हे पुणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ऑनलाईन पोर्टल आहे. जेथे विविध विभागाच्या योजना एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. यामाध्यमातून लाभधारकांना वेगवेगळ्या सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागत नाही.

उपलब्ध योजना (Scheme Under ZP Pune)

  1. कृषी विभाग योजना
    • ५ एच पी ओपनवेल विद्युत मोटर पंप संच
    • प्लॅस्टिक ताडपत्री ६x६ मीटर
    • ९० एम. एम. PVC पाईप
    • बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रे पंप
  2. समाज कल्याण विभाग योजना (Social Welfare)
    • जि.प. २०% निधी योजनेंतर्गत १००% अनुदानावर साहित्यांचा लाभ घेणेसाठी योजना
    • मागासवर्गीय व ५% दिव्यांग निधी २०% योजनेंतर्गत १००% अनुदानावर यशवंत घरकुलाचा लाभ योजना
  3. महिला व बाल कल्याण विभाग योजना (Women & Child Welfare)
  4. दिव्यांग कल्याण योजना (Disability Welfare)
    • अतित्तीव्र दिव्यांग (मतीमंद/बहुविकलांग/अंध/मुकबधीर) लाभार्थींना निर्वाह भत्ता देणेबाबतची वैयक्तिक योजना
  5. पशु संवर्धन योजना (Animal Husbandry)

अशा विविध विभागाच्या योजनांचा समावेश आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून लाभार्थींना मोबाईल वरून अर्ज करता येईल.

अर्ज कसा करावा (Application Process)

  • जिल्हा परिषद योजनेच्या https://zppunecessyojana.com/ या वेबसाईट ला भेट द्या.
  • मेनू पर्याय मधून अर्जदार वरती क्लिक केल्यानंतर नवीन अर्जदार नोंदणी पर्याय वरती क्लिक करा.
  • आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करा.
  • नोंदणी झाल्यानंतर अर्जदार लॉगइन पर्याय निवडून लॉग इन करा.
  • आपल्या पात्रतेनुसार/आपण भरलेल्या माहितीच्या आधारे आपण पात्र असलेल्या योजना दाखवल्या जातील.
  • ज्या योजनेचा अर्ज करावयचा आहे ती योजना निवडा.
  • संबधित माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज सबमिट करा आणि अर्जाची स्थिती Applicant Login पर्याय मध्ये पहाता येईल.

आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचे बँक पासबुक
  • रेशन कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवाशी दाखला
  • जातीचा दाखल (असेल तर)
  • अपंग प्रमाणपत्र (असेल तर)
  • उत्पन्नाचा दाखला (संबधित योजनेसाठी)
  • ७/१२, ८ अ (संबधित योजनेसाठी)
  • लाईटबिल (संबधित योजनेसाठी)

पात्रता (Eligibilty Criteria)

  1. अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावा
  2. योजनेच्या प्रकारानुसार उत्पन्न मर्यादा लागू राहिल
  3. महिला/शेतकऱ्यांसाठी/ दिव्यांगासाठी विशेष प्राधान्य

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *