नवीन मतदार यादी आली अशी करा डाउनलोड : Voter List 2025 Maharashtra

मतदार यादी (voter List) म्हणजे अशी अधिकृत यादी, ज्यामध्ये आपल्या गावातील/शहरातील वय वर्षे १८ पूर्ण झालेल्या आणि भारताचा नागरिक असलेल्या मतदाराचे नाव असते. ज्या व्यक्तीचे मतदार यादी मध्ये नाव आहे अशा व्यक्तींना मतदान करण्याचा हक्क मिळतो. हि यादी दरवर्षी नव्याने तयार केली जात नाही. तर ती वेळोवेळी अपडेट केली जाते.
Voter List Maharashtra 2025
मतदार वेळोवेळी अपडेट करणे खूप गरजेचे असते कारण यामुळे नवीन पात्र-अपात्र नागरिकांची नोंद होते तसेच मृत्यूमुळे किंवा स्थलांतरामुळे काही नावे काढली जातात. आपल्या मताचा अधिकार वापरण्यासाठी आपले नाव मतदार यादीमध्ये असणे आवश्यक आहे. यामुळे १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदविणे गरजेचे आहे.
प्रत्येक गाव शहर विभागानुसार वेगळ्या याद्या तयार केल्या जातात, यामुळे मतदार यादीमध्ये नाव शोधणे अधिक सोपे जाते. तसेच एका व्यक्तीचे नाव एकाच यादीमध्ये असू शकते. त्याच व्यक्तीचे नाव दुसऱ्या यादीमध्ये असल्यास ते बेकायदेशीर असते. मतदार यादीमध्ये आपले नाव नसेल तर आपण ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करू शकता.
मतदार यादी महत्वाची का आहे?
- मतदार यादीमध्ये नाव असणाऱ्या नागरिकांनाच मतदान करता येते, यादीमध्ये नाव नसेल तर मतदान करता येत नाही.
- या यादीमुळे निवडणुका अधिक पारदर्शक न्याय आणि विश्वासार्ह पार पडतात.
- लोकशाही मध्ये मतदार यादी हे सर्वसामान्यांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करणारे महत्वाचे साधन आहे.
मतदार यादीमध्ये आपले नाव कसे शोधावे?
यादीमध्ये नाव शोधण्यासाठी voter list name check अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जसे कि आपण निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वरती जाऊन आपली माहिती टाकून नाव तपासू शकता. किंवा निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वरून यादी डाऊनलोड करून आपले नाव यादीमध्ये शोधू शकता.
मतदान यादी डाउनलोड कशी करायची?
- मोबाईलमध्ये किंवा कॉम्पुटर मध्ये https://voters.eci.gov.in/download-eroll?stateCode=S13 हि वेबसाईट ओपन करा.
- यादी पाहण्यासाठी जिल्हा-तालुका/विधानसभा निवडा.
- यादी कोणत्या भाषेमध्ये पाहिजे टी भाषा निवडा.
- Roll Type मध्ये तुम्हाला कोणती यादी हवी आहे त्याचा प्रकार निवडा.
- गावानुसार यादी(गावांची यादी) पाहायला मिळेल.
- त्यामध्ये तुम्हाला ज्या गावाची यादी डाऊनलोड करायची आहे त्यासमोरील चौकोनात क्लिक करा.
- Roll Type च्या खालच्या बाजूला Captcha कोड दिलेला आहे तो चौकोनात भरा.
- त्यानंतर Download Selected PDFs वरती क्लिक आपण निवडलेल्या गावाची यादी डाऊनलोड होईल.