Tractor Anudan Yojana 2025; ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म सुरु

MahaDBT Farmer Tractor Apply Online

Mahadbt tractor anudan yojana : ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरु आहेत, ट्रॅक्टरसाठी अनुदान योजनेसाठी अर्ज कुठे करावा, त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात आणि Tractor Anudan Yojana साठी अनुदान किती मिळणार? याबद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.

Tractor anudan yojana 2025 ट्रॅक्टर अनुदान योजना 2025

आताची शेती म्हंटल कि मशागती साठी ट्रॅक्टर हा लागतोच. काही वर्षापूर्वी बैलाच्या सहाय्याने शेतीची संपूर्ण मशागत केली जायची अजूनही काही शेतकरी बैलाच्या सहाय्याने शेतीची मशागत केली जाते. अगदी पिक घरात येईपर्यत, मशागत पेरणी करण्यापासून ते पिकाची वाहतूक करण्यापर्यंत हि सर्व कामे बैलाच्या सहाय्याने करीत करतात. परंतु आता शेती करायची म्हंटल कि ट्रॅक्टर आधी घेतात ट्रॅक्टरमुळे पूर्ण दिवसाचे होणारे काम हे काही तासा मध्येच होते, यामुळे वेळेची बचत होते. परंतु जर ट्रॅक्टर घ्यायचा म्हंटल तर त्यासाठी खर्च जास्त येतो. परंतु शेतकऱ्याना चिंता करण्याची गरज नाही.

शासनाकडून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तसेच शेती संबधित सर्व औजारे आणि यंत्र इतर घटकासाठी मदत होते म्हणजेच अनुदान मिळते याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो. Tractor Anudan Yojana योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करणे गरजेचे आहे.

MahaDBT Farmer Tractor Apply Online

महाराष्ट कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण योजना/राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शेती उपयोगी औजारे, यंत्र आणि इतर साधने खरेदी करण्यासाठी शासन अनुदान देते. योजनेमधून ट्रॅक्टर या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. शेतकरी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या वेबसाईट वरती ऑनलाईन अर्ज करू शकतात किंवा ऑनलाईन सुविधा केंद्रावर जावून फॉर्म भरू शकतात. tractor anudan yojana maharashtra 2025 फॉर्म भरण्यासाठी 7350524525 या नंबरवर व्हॉट्सॲप वरती मेसेज करा. अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्याने दिलेल्या मोबाईल नंबरवरती एसएमएस येईल. तसेच योजनेमध्ये निवड झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्याला एसएमएस येतो.

Tractor Anudan Online Application

ट्रॅक्टरसाठी शासनाकडून अनुदान किती मिळते? आणि अर्ज ऑनलाईन करण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात? वाचा संपूर्ण माहिती. महाडीबीटी पोर्टल वरती ट्रॅक्टर या घटकासाठी शासनाकडून खालीलप्रमाणे अनुदान दिले जाते. प्रत्यक्ष अनुदानामध्ये काही बदल होऊ शकतो. अनुदान मध्ये आता शासनाने वाढ केलेली आहे. खालील अनुदान तक्ता हा पूर्वीप्रमाणे आहे, लवकरच नवीन माहिती अपडेट करू.

  • 2WD/4WD – ट्रॅक्टर ८ BHP ते २० BHP पर्यंत असेल तर
सर्वसाधारण प्रवर्ग अनु.जाती/अनु.जमाती प्रवर्ग/शेतकरी महिला/अल्पभूधारक शेतकरी/बहुभूधारक
७५००० रु.पर्यंत १००००० रु. पर्यंत
mahadbt farmer trator scheme
  • 2WD/4WD – ट्रॅक्टर क्षमता २० BHP ते ४० BHP पर्यंत असेल तर
सर्वसाधारण अनु.जाती/अनु.जमाती प्रवर्ग/शेतकरी महिला/अल्पभूधारक शेतकरी/बहुभूधारक
१ लाख रु.पर्यंत १ लाख २५ हजार रु.पर्यंत
mahadbt tractor subsidy
  • 2WD/4WD – ट्रॅक्टर ४० BHP ते ७० BHP पर्यंत असेल तर
सर्वसाधारण अनु.जाती/अनु.जमाती प्रवर्ग/शेतकरी महिला/अल्पभूधारक शेतकरी/बहुभूधारक
१ लाख रु.पर्यंत १ लाख २५ हजार रु.पर्यंत
tractor anudan subsidy

महाडीबीटी ट्रॅक्टर योजना 2025 कागदपत्रे

  • Farmer ID – शेतकरी ओळखक्रमांक
  • शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र (SC&ST प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी)
  • मोबाईल नंबर
  • अपंग असल्यास (Disability Certificate)

ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लाभार्थी शेतकरी असणे गरजेचे आहे, म्हणजेच त्याच्या नावे ७/१२ असणे गरजेचे आहे, तसेच अर्जदार शेतकऱ्याने आपले फार्मर आयडी काढणे बंधनकारक आहे, शेतकऱ्याकडे जर फार्मर आयडी नसेल तर त्या शेतकऱ्याला ऑनलाईन अर्ज भरता येणार नाही.

Similar Posts

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *