१ रुपयांत पिक विमा योजना झाली बंद : Pik Vima Yojana Maharashtra
Pik Vima Yojana Maharashtra : केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी विविध शेतकरी योजना राबविते, त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी शेती संबधित यंत्र किंवा औजारे यासाठी अनुदान दिले जाते तसेच शेतीसाठी लागणारी बियाणे व खते शासन अनुदानावर उपलब्ध करून करून देते. शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्ती मुळे शेतातील पिकाचे नुकसान होते, यामुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरु केली.
Pik Vima Yojana
प्रधानमंत्री पिक विमा योजनेतून शेतकऱ्यांना विविध पिकांसाठी, फळबागांसाठी पिक विमा भरता येतो. पिक विमा योजनेतून पिक विमा भरण्यासाठी शासनाकडून काही रक्कम विमा हप्ता भरला जातो व उर्वरित हिस्सा लाभार्थी शेतकऱ्याला भरावा लागतो. परंतु मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांसाठी शासनाने १ रुपयांत पिक विमा योजना सुरु केली होती, यामुळे शेतकऱ्यांना फळ पिक वगळता इतर पिकांसाठी फक्त १ रुपयात पिक विमा भरता येत होता.
१ रुपयामध्ये पिक विमा असल्यामुळे अनेक शेतकरी पिक विमा भरत असे, तसेच शासनाच्या असे निदर्शनास आले कि, ज्या व्यक्तीच्या नावावर जमीन नाही अशा व्यक्तींनी सुद्धा पिक विमा अर्ज भरले आहे. यामुळे शासनाने आता १ रुपयात पिक विमा योजना बंद केली असून शेतकऱ्यांना आता अधिकचे पैसे भरून पिक विमा भरावा लागणार आहे. यासंबधित शासनाने सुधारित आदेश सुद्धा जारी केला आहे.
पिक विमा Pik Vima किती भरावा लागणार?
शेतकऱ्यांना आता या वर्षीपासून खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा विमा भरताना लाभार्थी हिस्सा भरावा लागणार आहे. खरीप हंगामातील पिकासाठी २ टक्के रक्कम भरावी लागणार आहे, आणि रब्बी हंगामातील पिकांसाठी १.५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी ५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे.
