पिक विमा भरण्यासाठी मिळाली १५ दिवसाची मुदतवाढ; pik vima date extended 2024
pik vima date extended 2024 : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पिक विमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांसाठी १५ दिवसाची मुदत वाढविण्यात आली आहे, यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी राज्यात पिक विमा योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरु करण्यात आले होते, याची अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. १५ जुलै २०२४ हि देण्यात आली होती.
pik vima date extended पिक विमा योजना अर्ज करण्यासाठी मिळाली मुदतवाढ
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने १ रुपयामध्ये पिक विमा योजना सुरु केली, शेतकऱ्यांना शेतातील पिकाचा पिक विमा भरण्यासाठी फक्त १ रुपया द्यावा लागणार आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी पिक विमा हप्त्याची लाभार्थी हिश्शाची रक्कम भरावी लागत असे परंतु आता शेतकऱ्यांना फक्त १ रुपया भरावा लागणार आहे, कारण शेतकऱ्यांच्या लाभार्थी हिश्शाची रक्कम राज्य शासन भरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना १ रुपयामध्ये पिक विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. शेतकऱ्यांनी शेतातील पिकाचा विमा काढणे गरजेचे आहे, कारण काही कारणास्तव शेतातील पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याला संबधित विमा कंपनीद्वारे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मिळू शकते.
Pik vima last date new update
शेतकऱ्यांनी आता काळजी करण्याची गरज नाही कारण शेतकऱ्यांना मोबाईल वरून किंवा जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, संबंधित विमा प्रतिनिधी, ऑनलाईन सुविधा केंद्र द्वारे आपला पिक विमा अर्ज भरता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. १५ जुलै २०२४ देण्यात आली होती आता शेतकऱ्यांसाठी हि मुदत वाढवून Pik vima last date new update ३१ जुलै २०२४ करण्यात आली आहे. ३१ जुलै २०२४ पर्यंत शेतकऱ्यांना पिकाचा विमा ऑनलाईन भरता येणार आहे. पिक विमा योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे आधार कार्ड, बँक पासबुक, ७/१२, ८ अ, मोबाईल नंबर, पिक पेरा स्वयंघोषणापत्र तसेच क्षेत्र सामाईक असेल तर इतर खातेदारांचे संमतीपत्र इ. कागदपत्रे माहिती असणे आवश्यक आहे.
योजनेचे नाव | प्रधानमंत्री फसल बिमा योजना |
अर्ज करण्याची अंतिम मुदत | 31/07/2024 |