लाडकी बहिण ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये झाले जमा : Ladki Bahin Yojana August Installment

Ladki bahin yojana august installment : लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना आज पासून ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये जमा होणार आहेत. महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहिण योजना हि महत्वाची योजना आहे. या योजनेतून महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जातो.
लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलानांसाठी आनंदाची बातमी, राज्य शासनाकडून आज पासून म्हणजे ११ सप्टेंबर पासून ऑगस्ट महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे. राज्यातील २१ ते ६५ या वयोगटातील महिलांसाठी हि योजना लागू करण्यात आली आहे. विवाहित, विधवा, परित्यक्ता तसेच अविवाहित महिला योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. दर महिन्याला पात्र लाभार्थी महिलेला DBT (Direct Benefit Transfer) द्वारे १५०० रुपये खात्यामध्ये जमा केले जातात.
आज पासून लाडकी बहिण योजनेचे १५०० रुपये जमा होत आहे, ज्या लाभार्थींच्या खात्यावर १५०० जमा झाले नसतील तर काही दिवसांमध्ये जमा होतील.
लाडकी बहिण योजनेमुळे महिलांना मिळणार आर्थिक आधार
अधिकृत माहितीनुसार, राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळत आहे. ज्या महिलांना काही महिन्यापासून १५०० मिळत नाही कारण अशा महिला शासनाच्या लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत. यामुळे त्या महिलांना १५०० रुपये मिळत नाहीत. तसेच काही महिलांना फक्त ५०० रुपये दर महिना मिळत आहेत कारण त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे.