येथून अर्ज करा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ladakibahin.maharashtra.gov.in
ladaki bahin.maharashtra.gov.in : राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी, मागील काही दिवसापूर्वी शासनाने महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरु आहेत, अर्ज भरण्यासाठी शासनाने ऑनलाईन व ऑफलाईन हे दोन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मागील काही दिवसांपूर्वी नारीशक्ती दूत अँपद्वारे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती, अँपद्वारे अर्ज भरताना खूप वेळ लागत आहे. आता अर्ज करण्यासाठी शासनाने माझी लाडकी बहिण योजनेचे येथून अर्ज करा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ladakibahin.maharashtra.gov.in हे पोर्टल सुरु केले आहे.
ladaki bahin.maharashtra.gov.in
शासनाने अँपद्वारे तसेच ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टल द्वारे अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. १ जुलै २०२४ पासून नारीशक्ती दूत अँप मधून अर्ज भरणे सुरु झाले होते, आता १ ऑगस्ट २०२४ पासून महिलांना ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या पोर्टल वरती अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपले खाते तयार करावे लागणार आहे. खाते तयार झाल्यानंतरच आपल्याला अर्ज करण्याचा पर्याय मिळणार आहे.
महिला व बाल विकास विभाग, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करणे, आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिलेली आहे. या योजनेमधून २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळणार आहेत. लाभार्थींना १५०० रुपये DBT मार्फत म्हणजेच डायरेक्ट लाभार्थी महिलेच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे. यासाठी लाभार्थी महिलेचे आधार कार्ड बँक खात्याशी (NPCI) लिंक असणे आवश्यक आहे.
Ladki Bahin Maharashtra Yojana
महाराष्ट्र राज्य शासनाने महिलांसाठी महत्वपूर्ण हि योजना सुरु केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार महिला ladakibahin.maharashtra.gov.in या शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती अर्ज करू शकतात, तसेच ज्यांना वेबसाईट वरती अर्ज करणे शक्य नसल्यास जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र मध्ये जावून आपला अर्ज ऑनलाईन भरू शकता. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलेकडे योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थी महिलेने अर्ज करणे आवश्यक आहे, अर्ज केलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत हि ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत असणार आहे, यामुळे लाभार्थी महिलेने ३१ ऑगस्ट पूर्वी आपला अर्ज सादर करणे गरजेचे आहे. योजनेच्या अर्जासोबत लाभार्थीने हमीपत्र जोडणे आवश्यक आहे, या योजनेचा लाभ राज्यातील विवाहित महिला, विधवा महिला, परित्यक्त्या आणि निराधार महिला यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड (अर्जामध्ये आधार कार्ड प्रमाणे नाव नमूद करावे)
- अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला किंवा १५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड) यापैकी कोणतेही एक कागदपत्र असणे आवश्यक आहे.
- उत्पन दाखला (नसेल तर केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड ) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे २.५० लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- आपल्याकडे जर शुभ्र शिधापत्रिका असेल कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे २.५० लाखांपेक्षा कमी असल्याचे उत्पन्न दाखला)
- बँक खाते पासबुक (आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक)
- लाभार्थीचे हमीपत्र व फोटो सर्व कागदपत्रासोबत ladakibahin.maharashtra.gov.in या साईट वरून लाभार्थी व्यक्तीने ऑनलाईन अर्ज करावा.