सोलर पंप योजना नवीन अपडेट : Kusum Solar New Update

PM Kusum Solar Yojana Maharashtra

Kusum Solar New Update : कुसुम सोलर पंप योजनेचा अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कारण प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत, परंतु त्याची आज पर्यंत निवड झाली नाही अशा शेतकऱ्यांची निवड प्रक्रिया सुरु झाली आहे. आपली निवड झाली का? पहा

PM Kusum Solar Yojana Maharashtra

प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजनेतून शेतकऱ्यांना ९०% ते ९५% अनुदान सौर पंपासाठी दिले जाते. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची निवड झाल्यानंतर विहित कालावधी मध्ये लाभार्थी हिस्स्याची रक्कम ऑनलाईन भरावी लागते, लाभार्थी हिस्सा भरण्यापूर्वी शेतकऱ्याने आलेला मेसेज हा अधिकृत आहे का? हे पाहूनच हिस्सा भरावा. परंतु लाभार्थी हिस्सा भरण्यापूर्वी शेतकऱ्याला सेल्फ सर्व्हे करणे गरजेच आहे.

PM Kusum Solar Yojana
PM Kusum Solar Yojana

सेल्फ सर्व्हे मध्ये लाभार्थीने शेतामध्ये जाऊन त्याठिकाणी प्रत्यक्ष फोटो व इतर माहिती सेल्फ सर्व्हे मध्ये द्यावी लागते. सेल्फ सर्व्हे करत असताना आपण वापरत असलेले मोबाईल ॲप्लिकेशन हे शासनाचे आहे का? हे पाहूनच सेल्फ सर्व्हे करावा. मोबाईल ॲप्लिकेशन कोठून घेयच? गुगल प्ले-स्टोअर मधून Meda Beneficiary हे ॲप्लिकेशन घेयच आहे. व त्यामधून सेल्फ सर्व्हे करायचा आहे.

तसेच शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी असेल तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा एसएमएस येत आहेत, उदा. ७/१२ मध्ये पाण्याच्या स्त्रोताची नोंद नसणे, कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळणे इ. ज्या शेतकऱ्यांना एसएमएस आलेले आहेत त्यांनी विहित कालावधी मध्ये त्रुटीची पूर्तता करावी. व ज्या शेतकऱ्यांना निवड झालेले मेसेज आलेत म्हणजेचे लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी, त्या शेतकऱ्यांनी आलेला मेसेज खरा आहे का हे पाहूनच पुढील प्रोसेस करावी, निवड झालेला मेसेज आल्यानंतर सर्व प्रथम सेल्फ सर्व्हे करावा लागेल व त्या नंतर पेमेंट करण्याचा पर्याय येईल.

ज्या शेतकऱ्यांना निवड झालेला मेसेज आला नाही अशा शेतकऱ्यांनी मोबाईल मध्ये MEDA Beneficiary हे ॲप्लिकेशन घेयच आहे, व त्यामध्ये फॉर्म भरताना दिलेला मोबाईल नंबर व ओटीपी टाकून लॉगीन करा. त्यानंतर Application Details या पर्यायावर क्लिक करा. त्याठिकाणी जर तुम्हाला Self Survey हा पर्याय दिलेला असेल तर आपली निवड झाली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *