कडबाकुट्टी मशीनसाठी ऑनलाईन अर्ज सुरु; Kadba Kutti Machine Yojana 2024
Kadba Kutti Machine Yojana 2024 : कडबाकुट्टी मशीनसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरणे गरजेचे आहे. कडबाकुट्टी मशीनसाठी किती अनुदान मिळणार, अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, अर्ज कुठे करायचा याबद्दल सविस्तर व संपूर्ण माहिती याठिकाणी दिलेली आहे.
कडबाकुट्टी मशीन योजनेबद्दल माहिती
कडबाकुट्टी मशीनसाठी शेतकरी/अर्जदार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात, कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत कडबाकुट्टी मशीन करिता अनुदान दिले जाते, योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
योजनेसाठी अर्ज केल्यानंतर काही दिवसामध्ये आपली निवड होईल, निवड झाल्यानंतरच आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील, कागदपत्रे तपासणी झाल्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती पत्र मिळेल, पूर्व संमती पत्र मिळाल्यानंतरच आपण कडबाकुट्टी मशीन यंत्र घ्यायचे आहे, पूर्व संमती पत्र मिळण्यापूर्वी मशीन खरेदी करू नये. अधिक माहितीसाठी राजपुरे डिजिटल केंद्राला भेट द्या.
KadbaKutti मशीन साठी अनुदान किती मिळणार
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अल्पभूधारक आणि बहुभूधारक शेतकरी/महिला शेतकरी | इतर लाभार्थ्यांसाठी |
२० हजार रु. पर्यंत | १६ हजार रु. पर्यंत |
अर्ज/फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे/माहिती
- आधार कार्ड झेरोक्स
- बँक पासबुक झेरॉक्स
- ७/१२, ८अ (राजपुरे डिजिटलमध्ये उपलब्ध
- मोबाईल नंबर
- SC/ST प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र
ऑनलाईन अर्ज/फॉर्म भरण्यासाठी संपर्क
महत्वाचे
- घरबसल्या सेवेचा लाभ घेण्यासाठी आमच्याशी व्हाॅट्सअपवर संपर्क करा.
- प्रत्यक्ष ऑफिस ला भेट देण्यासाठी वरील पत्त्यावर क्लिक करा.
- अर्जासोबत शुल्क/फी भरावी.