रेशन कार्ड केवायसी झाली का? असे चेक करा : Ration Card eKYC Status

Ration Card eKYC Status

Ration Card eKYC Status : रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्वाची माहिती, शासनाने आता सर्व रेशन कार्ड धारकांना तसेच त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. रेशन कार्ड धारक आता मोबाईल वरून ई-केवायसी घरबसल्या करू शकता. यामुळे त्यांना रेशन धान्य दुकानदाराकडे ई-केवायसी करण्यासाठी जाण्याची आवश्यकता नाही. आपली केवायसी झाली का? आत्ताच चेक करा.

Ration Card eKYC Maharashtra

रेशन कार्ड हे सरकार कडून सामान्य नागरिकांना दिले जाणारे एक अधिकृत तसेच महत्वाचे असे कागदपत्र आहे. या रेशन कार्ड द्वारे पात्र लाभार्थी कुटुंबाला स्वस्त दरात अन्नधान्य दिले जाते. तसेच याचा स्थानिक रहिवाशी पुरावा म्हणून देखील उपयोग होतो. आता शासनाने रेशन धारक कुटुंबातील सर्व सदस्यांनी केवायसी करणे बंधनकारक केले आहे. जर लाभार्थी कुटुंबाने जर ई-केवायसी केली नाही तर त्यांचे रेशन धान्य बंद होऊ शकते, तसेच रेशन कार्ड सुद्धा बंद होऊ शकते, यामुळे प्रत्येक लाभार्थी कुटुंबाने आपली ई-केवायसी करून घेणे आवश्यक आहे. केवायसी झाल्यानंतर आपली केवायसी झाली आहे का? हे पाहणे सुद्धा गरजेचे आहे.

एकदा केवायसी झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा आपली केवायसी झाली आहे का? चेक करणे गरजेचे आहे, कारण जर त्या व्यक्तीची ई-केवायसी झाली नाही, तर त्या व्यक्तीचे रेशन कार्ड मधून नाव वगळले जाऊ शकते. यामुळे केवायसी केल्यानंतर आपली केवायसी झाली का हे चेक करणे आवश्यक आहे. खालील स्टेप फॉलो करून आपण रेशन कार्ड केवायसी झाली का पाहू शकता.

ज्या रेशन कार्ड धारकाने अजून ई-केवायसी केली नसेल तर अशा लाभार्थी Mera KYC या अँप्लिकेशन वरून केवायसी करू शकतात.

Ration Card eKYC Status

रेशन कार्ड केवायसी झाली आहे का? हे पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

  • सर्व प्रथम मोबाईल मध्ये प्ले-स्टोअर वरून Mera Ration हे अँप्लिकेशन इंस्टाँल करून घ्या.
  • अँप्लिकेशन उघडा व भाषा निवडून Next वरती क्लिक करा, आणि Get Started वरती क्लिक करा.
  • पुढील चौकोनामध्ये आधार क्रमांक टाकावा, व Captcha कोड टाकून Login With OTP वरती क्लिक करावे.
  • आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती एक सहा अंकी ओटीपी येईल तो टाकून Verify करा.
  • पुन्हा SkipAllow वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्यासमोर आधार कार्ड प्रमाणे रेशन कार्ड पाहायला मिळेल.
  • त्याठिकाणी तुम्हाला Manage Family Details व रेशन कार्डमधील व्यक्तींची संख्या पाहायला मिळेल. त्यावरती क्लिक करा.
  • प्रत्येक व्यक्तीच्या नावाच्या खाली Aadhar KYC ऑप्शन दिसेल, ज्या व्यक्तींनी केवायसी झाली आहे, अशा लाभार्थीच्या Aadhar KYC च्या समोर KYC Verified असे दिसेल.
  • ज्या लाभार्थींची के वायसी झालेली नाही त्यांच्या नावासमोर Not reported by State असे असेल.

महत्वाचे : केवायसी केल्यानंतर केवायसी अपडेट होण्यासाठी काही दिवस लागू शकतात, यामुळे आपण जर केवायसी केली असेल तर काही दिवसानंतर आपण Ration card ekyc status चेक करू शकता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *