१ रुपयामध्ये पिक विमा अर्ज भरणे झाले सुरु : 1 rs pik vima yojana maharashtra

rs 1 pik vima yojana

Pik vima yojana maharashtra : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कारण प्रधानमंत्री फसल बिमा योजना (प्रधानमंत्री पिक विमा योजना) सुरु झाली आहे. रब्बी हंगामातील पिकांचा विमा शेतकऱ्यांना फक्त १ रुपयामध्ये काढता येणार आहे.

प्रधानमंत्री फसल बिमा योजना – प्रधानमंत्री पिक विमा योजना

रब्बी हंगामातील पिक विमा काढण्यासाठी अर्ज सुरु झाले आहेत. यासाठी शेतकऱ्याने ऑनलाईन पिक विमा अर्ज भरणे गरजेचे आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मागील काही वर्षापासून फक्त एक रुपयामध्ये पिक विमा योजना सुरु केलेली आहे. या योजनेला सर्व समावेशक पिक विमा योजना असे नाव देण्यात आले आहे. म्हणजेच या पूर्वी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेमधून शेतकऱ्यांना लाभार्थी हिश्शाची विमा रक्कम भरावी लागत असे, परंतु आता शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरावा लागणार आहे.

योजनेचे नावप्रधानमंत्री फसल बिमा योजना
योजनेची अधिकृत वेबसाईटhttps://pmfby.gov.in/
हंगामरब्बी हंगाम
अर्ज कुठे करावाCSC, आपले सरकार सेवा केंद्र,
ऑनलाईन सुविधा केंद्र

नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेतातील पिकाचे नुकसान झाल्यास संबधित विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना पिकाचे झालेल्या नुकसानीचे पैसे (नुकसान भरपाई) मिळते. यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतातील पिकाचा पिक विमा काढणे अत्यंत गरजेचे आहे.काही कारणामुळे जर पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळू शकते. पिक विमा अर्ज भरल्यानंतर लाभार्थीने आपल्या ७/१२ वरती आपला पिकाची नोदणी म्हणजेच पिक पाहणी करणे आवश्यक आहे.

पिक विमा काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे – 1 rs pik vima documents

  • शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • शेतकऱ्याचे बँक खाते पासबुक
  • पिक पेरणी बाबतचे स्वयंघोषणा पत्र
  • ७/१२ उतारा, ८अ
  • मोबाईल नंबर
  • क्षेत्र सामाईक असल्यास इतर खातेदाराचे संमती पत्र

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *