MahaBhunakasha Maharashtra; गट नंबर टाका आणि जमिनीचा नकाशा पहा

mahabhunakasha Maharashtra Online

Mahabhunakasha maharashtra : बऱ्याच जणांना माहिती नसेल आपल्या जमिनी शेजारी कोणते गट आहे. आपल्याकडे जर नकाशा Bhunakasha असेल तर काही मिनिटा मध्ये आपल्याला माहिती मिळेल. तसेच काही वेळेस आपल्याला जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी लागतो. जमिनीचा नकाशा मोबाईलवरून कसा काढायचा याबदल सविस्तर संपूर्ण माहिती यालेखात दिलेली आहे.

Bhunakasha Maharashtra Online (भू नकाशा महाराष्ट्र)

जमिनीचा नकाशा भू नकाशा महाराष्ट्र jaminicha nakasha maharashtra आपण मोबाईल वरून काढू शकतो. यासाठी नकाशा काढण्यासाठी कुठेही जावे लागणार नाही. घरबसल्या मोबाईल वरून काही मिनिटामध्ये आपण पीडीएफ मध्ये हा नकाशा काढू शकता. शासनाची नकाशा पाहण्यासाठी स्वतंत्र वेबसाईट उपलब्ध आहे. संकेतस्थळावरून आपण घरबसल्या कोणत्याही गावातील जमिनीचा नकाशा काही मिनटामध्ये मोबाईल वरती पाहू शकता किंवा डाउनलोड करू शकता.

माहितीमहाभूनकाशा महाराष्ट्र (mahabhunakasha maharashtra)
नकाशा पाहण्याची पद्धतऑनलाईन
विभागमहसूल विभाग महाराष्ट्र
अधिकृत वेबसाईटhttps://mahabhumi.gov.in/

महाराष्ट्र शासनाने नागरिकांसाठी जमिनी संबधित विविध सेवा ऑनलाईन सुरु केल्या आहेत. उदा. शेतजमिनी चा फेरफार उतारा/भूमी अभिलेख फेरफार, जुने फेरफार, जुने सातबारा, चालू फेरफार, आपली चावडी, फेरफार डाउनलोड, मालमत्ता पत्रक पाहणे, ई-नकाशा/भू नकाशा, ई-मोजणी, ई-पिक पाहणी, ई -चावडी ,जमीन महसूल भरणा, फेरफार स्थिती अशा अनेक सुविधा ऑनलाईन सुरु करण्यात आलेल्या आहेत. नागरिक इ. सुविधेचा लाभ घरबसल्या मोबाईल वरून घेऊ शकतात.

Mahabhunakasha mahabhumi gov in

जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी शासनाने https://mahabhumi.gov.in/27/index.jsp हि साईट उपलब्ध करून दिली आहे.जमिनीचा नकाशा mahabhunakasha पाहण्यासाठी आपल्याकडे गट नंबर असणे गरजेचे आहे.गट नंबर नसेल तर आपण https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या वेबसाईट वरून जमिनीचा गट नंबर शोधू शकता.

शासनाने नागरिकांसाठी महसूल खात्या संबधित विविध सेवा ऑनलाईन केलेल्या आहेत. यामध्ये जमिनीचे ७/१२ उतारे, गाव नमुने, फेरफार, नकाशे, वारस नोंद अर्ज, फेरफार मध्ये बदल करणे, ई-हक्क प्रणाली अशा विविध सेव ऑनलाईन उपलब्ध आहेत, नागरिकांना घरबसल्या या सेवांचा लाभ घेता येणार आहे. महाराष्ट्र राज्यात अमरावती, पुणे, नाशिक, नागपूर, कोकण, छत्रपती संभाजी नगर असे एकूण ६ महसूल विभाग आहेत,

जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा

जमिनीचा नकाशा (bhunaksha maharashtra) काढण्यासाठी आपल्याला गट नंबर माहिती असणे आवश्यक आहे, आपण खालील स्टेप फॉलो करून आपल्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन मोबाईलवरती पाहू शकता.

  • सर्वप्रथम मोबाईल मध्ये क्रोम ओपन करून https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp हि साईट त्यामध्ये ओपन होण्यास वेळ लागू शकतो.
  • किंवा आपण गुगल सर्च मध्ये mahabhunakasha असे टाईप करून सर्च करू शकता. सर्च केल्यानंतर तुम्हाला वरील लिंक दिसेल त्यावरती क्लिक करावे लागेल.
  • वेबसाईट ओपन झाल्यानंतर खालील प्रमाणे माहिती दिसेल.
mahabhunakasha maharashtra
mahabhunakasha maharashtra
  • होम (HOME) समोर तीन रेषा दिसतील त्यावरती क्लिक करावे, नंतर तुम्हाला आपले राज्य निवडायचे आहे.
  • जिल्हा, तालुका आणि गाव निवडावे, त्यानंतर Search Plot No. खालील बॉक्स मध्ये आपला गट नंबर टाकावा त्या समोरील सर्च या चिन्हावर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर आपल्या गटाचा नकाशा आपल्याला मोबाईल वरती पाहायला मिळेल. नकाशा पाहण्यासाठी पुन्हा HOME समोरील तीन रेषा वरती क्लिक करावे. आपल्या गटाचा नकाशा पाहायला.
mahabhunakasha mahabhumi gov in
mahabhunakasha mahabhumi gov in
  • नकाशा मोबाईल मध्ये डाऊन+लोड करण्यासाठी Map Report वरती क्लिक करावे लागेल.
  • आपल्याला Open हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक केल्यानंतर आपला नकाशा मोबाईल मध्ये सेव्ह होईल.

जमिनीचा नकाशा कसा बघायचा

अशा प्रकारे आपण आपल्या गटाचा jaminicha nakasha online नकाशा mahabhunakasha.mahabhumi.gov.in मोबाईल वरती काही मिनिटामध्ये पाहू शकता. आता शेतकऱ्यांना घरबसल्या ७/१२ संबधित सर्व कामे करता येणार आहे, शासनाने शेतकऱ्यांसाठी ई-हक्क प्रणाली तयार केलेली आहे. ई-हक्क प्रणालीद्वारे नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने ७/१२ मधील बदल करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी तलाठी कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही. आता शासनाने महसूल खात्याची सर्व सेवा एकाच ठिकाणी देण्यासाठी नवीन पोर्टल विकसित केले आहे. नवीन संकेस्थळाद्वारे विविध सेवांचा लाभ मिळणार आहे. उदा. शेतीचा नकाशा पाहणे 7/12 nakasha, डिजिटल ७/१२, ८अ, फेरफार, मिळकत पत्रिका, ई-रेकॉर्ड, ई-जमीन मोजणी अर्ज, अशा विवध सेवा https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ या पोर्टल वरती उपलब्ध आहे.

जमिनीचा नकाशा कसा काढायचा?

जमिनीचा नकाशा मोबाईल वरून काढता येईल, mahabhunakasha.mahabhumi.gov.in या वरून आपण जमिनीचा नकाशा काढू शकता. त्याच बरोबर आपण नकाशाचा रिपोर्ट सुद्धा काढता येईल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *