लाडकी बहिणींसाठी खुशखबर : नोव्हेंबर चा हप्ता जमा होण्यास सुरुवात
ladki bahin november hafta : राज्यातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात DBT (Direct Benefit Transfer) द्वारे रक्कम टप्याटप्याने जमा केली जात आहे.
हप्ता कधी मिळणार?
लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्व लाभार्थी ना एकाच दिवशी मिळत नाही. राज्य शासनाकडून हप्ता वेगवेगळ्या टप्प्यामध्ये जमा केला जात असल्यामुळे काही महिलांच्या खात्यात आधीच रक्कम जमा झाली आहे, तर उर्वरित महिलांना पुढील काही दिवसांत हप्ता मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मिळणार आर्थिक आधार
अधिकृत माहितीनुसार, राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळत आहे. ज्या महिलांना काही महिन्यापासून १५०० मिळत नाही, कारण अशा महिला शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत. यामुळे त्या महिलांना १५०० रुपये मिळत नाहीत. तसेच काही महिलांना फक्त ५०० रुपये दर महिना मिळत आहेत. कारण त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने चा लाभ मिळत आहे.
हप्ता न मिळाल्यास काय करावे?
जर तुमच्या बँक खात्यात अजून रक्कम जमा झाली नसेल, तर खालील गोष्टी तपासणे आवश्यक आहे-
- बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का? चेक करावे.
- DBT स्टेट्स Active आहे का पहा.
- अर्ज Approved आहे का चेक करा.
- बँक खात्यात कोणतीही तांत्रिक अडचण नाही ना हे पहा.
