HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी मिळाली पुन्हा मुदतवाढ : HSRP Number Plate Maharashtra

HSRP Number Plate Maharashtra : महाराष्ट्र राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना HSRP (उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट) बसविणे बंधनकारक केले असून एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी 15 ऑगस्ट 2025 हि मुदत देण्यात आली होती परंतु अजून बऱ्याच वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविल्या नसल्यामुळे व काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणीमुळे नंबर प्लेट बसविण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे.
HSRP Number Plate Maharashtra last date
शासनाने HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी 15/08/2025 पर्यंत मुदतवाढ दिली होती, परंतु अनेक जुन्या वाहनांना नंबर प्लेट बसविणे बाकी hsrp number plate date extended असल्यामुळे एचएसआरपी बसविण्यासाठी मुदत वाढवून मिळावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती तसेच काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणीमुळे, HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी शासनाने 30/11/2025 म्हणजेच ३० नोव्हेंबर २०२५ हि अंतिम मुदत दिलेली आहे. यामुळे नागरिकांनी विहित कालावधी मध्ये आपल्या वाहनाला उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवून घेणे गरजेचे आहे.
३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसविण्यासाठी पुढील अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहन मालकावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही, परंतु 30/11/2025 नंतर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसविणाऱ्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. यामुळे जर आपले वाहन हे १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेले असेल तर आजच आपली एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी अपॉइंटमेंट बुक करा.
एचएसआरपी (HSRP) नंबर प्लेट का महत्वाची आहे?
HSRP नंबर प्लेट चे फायदे हि नंबर प्लेट हि वेगळ्या पद्धतीने बनविली जाते यामुळे याची कॉपी करून कोणी बनावट नंबर प्लेट कोणी करू शकत नाही, यामुळे त्या वाहनाची सुरक्षा वाढते, त्याची चोरी व गैरवापर करता येत नाही, म्हणजेच या नंबर प्लेट मध्ये छेडछाड करता येत नाही यामुळे वाहन चोरी होण्यापासून सुरक्षा होऊ शकते. सर्व वाहनांना एक सारख्या प्रकारची नंबर प्लेट असल्यामुळे वाहनाची ओळख पटविणे सोपे जाते.
Hsrp plate number