शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पिक विमा योजना सुरु : 1 Rs Pik Vima Maharashtra

1 Rs Pik Vima Maharashtra

1 Rs Pik Vima Maharashtra : शेतकरी बांधवांसाठी महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यासाठी खरीप हंगामातील पिक विमा अर्ज सुरु झाले आहेत. आता शेतकऱ्यांना १ रुपयामध्ये पिक विमा भरता येणार आहे, वाचा सविस्तर माहिती.

1 rs pik vima online apply

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, प्रधानमंत्री फसल बिमा योजनेमधून शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामातील पिकांसाठी विमा ऑनलाईन भरण्यास सुरुवात झाली आहे. पावसामुळे, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होते. शेतकऱ्याने जर पिक विमा भरला असेल तर झालेल्या पिकाची नुकसान भरपाई संबधित विमा कंपनीकडून शेतकऱ्याला मिळू शकते.

योजनाप्रधानमंत्री फसल बिमा योजना
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
1 rs pik vima online apply

1 Rs Pik Vima Online Apply

प्रधानमंत्री फसल बिमा योजनेच्या अधिकृत साईटवरती शेतकऱ्यांना पिक विमा ऑनलाईन भरता येईल, आपल्या जवळील कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र किंवा ऑनलाईन सुविधा केंद्र याठिकाणी जाऊन सुद्धा शेतकऱ्यांना पिक विमा अर्ज भरता येईल.

विमा भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • बँक खाते पासबुक
  • पिक पेरा स्वयंघोषणापत्र
  • मोबाईल नंबर
  • ७/१२, ८अ उतारा

Pik Vima Yojana Information In Marathi

  • पिक विमा भरताना माहिती अचूक भरावी.
  • पिक विमा भरल्यानंतर केलेल्या पिकाची शेतकऱ्याने ई पिक पाहणी करून घ्यावी, म्हणजेच पिकाची नोंद ७/१२ वरती करून घ्यावी.
  • पिक विमा जमा होण्यासाठी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे.
  • आधार कार्ड, बँक खाते पासबुक व ७/१२ वरील नाव एकसारखे असावे.

Similar Posts

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *