MahaDBT Farmer List : शेतकरी योजना लाभार्थी यादी पहा ऑनलाईन

MahaDBT Farmer List : शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासन विविध योजना राबविते, या योजनांमुळे शेतकऱ्यांना शेती संबधित कामे लागणारी औजारे यंत्र खरेदीसाठी अनुदान मिळते. तसेच एकाच अर्जाद्वारे विविध योजनासाठी अर्ज करता येत आहे. अनेकदा शेतकऱ्यांमध्ये चर्चा होते कि गावातील शेतकऱ्यांना शेतकरी योजनांचा लाभ मिळत नाही. आता शेतकरी स्वतः मोबाईल वरून आपल्या गावामध्ये किती शेतकऱ्यांना शेतकरी mahadbt labharthi list योजनांचा लाभ मिळाला हे मोबाईल वरून पाहू शकतात.
योजनांचा लाभ कोणाला मिळाला? अनुदान किती मिळाले? हि संपूर्ण माहिती मोबाईल वरून पाहता येते. महाडीबीटी पोर्टल वरती शेतकऱ्यांना शेतीविषयक योजनासाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. अर्ज भरल्याननंतर शेतकऱ्याची योजनेमध्ये निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना SMS द्वारे कळविले जाते. त्यानंतर शेतकऱ्यांना संबधित कागदपत्रे योजनेच्या पोर्टल वरती अपलोड करावी लागतात, सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर वस्तू खरेदी करण्यासाठी/काम सुरु करण्यासाठी पूर्वसंमती पत्र दिले जाते. काम पूर्ण झाल्यानंतर पहाणी करून अनुदानाची पुढील प्रोसेस केली जाते अशा प्रकारे महाडीबीटी पोर्टल वरती प्रोसेस असते.
खालील स्टेप फॉलो करून शेतकरी लाभार्थी labharthi list यादी पाहू शकतात.
- Mahadbt Farmer list यादी पाहण्यासाठी सर्व प्रथम https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login हे पोर्टल उघडा.
- खालील प्रमाणे तुम्हाला अर्जाची सद्यस्थिती तपासा, लॉटरी यादी व निधी वितरीत लाभार्थी यादी हे पर्याय पाहायला मिळतील.

- निधी वितरीत लाभार्थी यादी हा पर्याय निवडावा, त्यानंतर लाभार्थी तपशील शोधा यामध्ये काही पर्याय पाहायला मिळतील.
- सर्वप्रथम आपला जिल्हा निवडा नंतर तालुका व गाव निवडावे.
- शोधा या बटन वरती क्लिक करावे, त्यानंतर तुम्हाला गावातील लाभार्थ्यांची यादी पाहायला मिळेल.
- आपण ती यादी PDF फाईलमध्ये किंवा Excel फाईल मध्ये डाऊनलोड करू शकता.